Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो तर काही काही व्हिडीओ पाहून मन भावुक होतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई पुण्याच्या कॅम्प रोडवर कला सादर करताना दिसत आहे. आजीबाईची कला पाहून तुम्हीही भारावून जाल. (Pune video an old lady showing art on camp road in pune video goes viral on social media)
पुण्यातील कॅम्प रोडवर कला सादर करतात आजीबाई! (an old lady showing art on camp road in pune)
पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय असं शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराची ओळख सांगते. ऐतिहासिक वास्तू पासून प्राचीन मंदिरांपर्यंत, गडकिल्ल्यांपासून, येथील जुन्या पेठ्यापर्यंत, पुणेरी भाषेपासून पुणेरी पाट्यांपर्यंत अनेक गोष्टी नेहमी चर्चेत येतात. सोशल मीडियावर या शहरातील अनेक ठिकाणचे व्हिडीओ व्हायरल होतात.
असाच हा व्हिडीओ कॅम्प रोडवरील आहे. या कॅम्प रोडवर एक आजीबाई नऊवारी नेसून काठीची कला सादर करताना दिसत आहे. आजी अतिशय उत्साहाने सला सादर करताना दिसत आहे. असं म्हणतात कलेला वयेचं बंधन नसते आणि पोट भरण्यासाठी व्यक्तीला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर खूप मेहनत घ्यावी लागते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या आज्जी पासून प्रेरणा मिळेल. व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यात कॅम्प रोडवर कला दाखवणाऱ्या या आजीबाईंना सलाम”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
iloovepune__official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही पाहिलंय का या आजींना पुण्यात ,नक्की यांच्या कलेला दाद द्या..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या आजी खराडी मद्ये पण असतात.” तर एका युजरने लिहिलेय, “गरिबी खुप वाईट आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “अनाथालय चालवते ही आजी. मुलांचा खर्च स्वत: उचलते.”