Pune Video : पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पुणे महाराष्ट्र पोलीसांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील पोलीस कर्मचारी पुणेकरांना सावध करत त्यांना एका स्कॅमविषयी माहिती सांगतो. हा स्कॅम नेमका काय आहे? आज आपण त्या विषयी जाणून घेऊ या त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक पोलीस कर्मचारी बोलत आहे. हा पोलीस कर्मचारी म्हणतो, “नमस्कार मित्रांनो, मी एके पोलीस. एक नवीन स्कॅम चालू आहे. हा व्हिडीओ बघा आणि नंतर आपण भेटू. त्यानंतर व्हिडीओध्ये पुढे एक दुचाकी चालक दिसतो. तो एका ठिकाणी दुचाकी पार्क करतो आणि तोंडाला रुमाल बांधतो. त्यानंतर तो एका दुकानात जातो आणि एक कॉफीची ऑर्डर देतो. कॉफी प्यायल्यानंतर तो दुकानदाराला विचारतो, “किती पैसे झाले दादा?” दुकानदार २० रुपये झाले असे सांगतो. त्यानंतर तो फोन पे वर पैसे देतो आणि दुकानदाराला म्हणतो, “चुकून २० हजार झाले दादा. तुम्ही मला फोन पे करा ना प्लीज” त्यानंतर दुकानदार त्यांना १९९८० रुपये परत करतो. त्यानंतर तो तिथून निघून जातो. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुणेकर सावधान असं तुमच्याबरोबर ही घडू शकते. फोन पे चा असाच वापर करतात हे फ्रॉड लोक”

पाहा व्हायरल व्हिडीओ

ak_police_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाराष्टातील सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. सावधान रहा सतर्क राहा. Phone pay नी असा तुमच्याबरोबर स्कॅम होऊ शकतो”

हेही वाचा : स्कॉर्पिओचं नियंत्रण सुटलं अन् ४ सेकंदातच भयानक घडलं, नेमकं कुठे चुकलं तुम्हीच सांगा; अपघाताचा Live VIDEO व्हायरल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दादा तू हा व्हिडिओ बनवला बरं झालं कारण असंच मला पण एक कॉल आला होता आणि बोलला की चुकून पन्नास हजार ट्रान्सफर झाले तुमच्या भावाने मला तुम्हाला ट्रान्सफर करायला सांगितलेले १५ हजार तर माझ्याकडं ५० हजार झाले. मला बोलला की मेसेज चेक करा तुम्हाला पेमेंट आला की नाही आणि मी केला चेक तर मला पेमेंटचा मेसेज आला होता पण माझ्या फोन पेला जमा नव्हते पैसे तर हे मेसेज मस्तीमध्ये घेऊ नका, या दादा ने खरंच व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी केला आहे मला अनुभव आला आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “माहिती चांगली आहे सर, काळजी तर घ्यायला पाहिजे. पण क्रॉस चेक केल्याशिवाय कसे काय परत पैसे देतील.” आणखी एका युजरने लिहिलेय, “पण पैसे देण्याआधी आपल्या फोन पे हिस्ट्री मध्ये किती पैसे आले ते चेक केले पाहिजे ना”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video be alert punekar from phone pay scam video ndj