Viral Video : गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी ढगांचा गडगडाट अन् वीजांचा कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अशात अनेक धरणे, तलाव आणि नद्या ओसंडून वाहत आहे.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मुळशी धरणाचा आहे. मुळशी धरणाचे सौंदर्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (pune video beauty of mulshi dam video viral of Arial view of Mulshi Dam
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला मुळशी धरण दिसेल. व्हिडीओत तुम्हाला मुळशी धरणातील पांढरे शुभ्र पाणी वाहताना दिसले. मुळशी धरणाच्या या नयनरम्य दृश्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. पावसामुळे धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे.
अनेक लोक या ठिकाणी गर्दी करतात पण पावसाच्या वातावरणात धरण परिसरात कोणीही जाऊ नये, असा सुचना प्रशासनाकडून दिल्या जातात. जर तुम्हाला हे धरण पाहायचे असेल तर टेन्शन घेऊ नका. खालील व्हिडीओ पाहा आणि घरच्या घरी सुखरुप या नयनरम्य दृश्याचा आनंद घ्या.
हेही वाचा : मुंबई लोकलच्या ‘तिच्या’ पहिल्याच प्रवासात काय घडलं? विदेशी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
मुळशी धरणाचे सौंदर्य! (beauty of mulshi dam )
मुळशी घरण हे एक पर्यटन स्थळ आहे. अनेक लोक पावसाळ्यात या ठिकाणी गर्दी करतात. मुळशी धरणाची निसर्गरम्य भव्यता पाहून कोणीही थक्क होते. सौंदर्याने वेढलेले आणि अतिशय आकर्षक दिसणारे हे धरण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे.हे धरण पुण्यापासून ४१ किमी अंतरावर आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
hellopune__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुळशी धरणाची सुंदरता”
हेही वाचा : माणसं ओळखायला आपण चुकतो! ज्याला जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला; VIDEO एकदा पाहाच
खडकवासला धरणाचा व्हिडीओ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी इमोजी शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी खडकवासला धरणाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी तो व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. पुण्यात अति पाऊस झाल्यानंतर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला होता. त्या दरम्यानचा तो व्हिडीओ होता.