Viral Video :पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, खाद्यसंस्कृती, आणि मराठमोळ्या अंदाजासाठी पुणे हे नावाजलेले आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी फक्त शिकण्यासाठीच नाही तर नोकरी करण्यासाठी सुद्धा पुण्यात येतात. पुण्यात आलेले लोकं पुण्याच्या प्रेमात पडतात आणि पुणेरी होऊन जातात. सोशल मीडियावरही पुण्यातील व्हिडीओ, मीम्स व्हायरल होत असतात. सध्या पुण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील बर्ड व्हॅली( Bird Valley) येथील सुंदर लेझर शो दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही कधी हा लेझर शो पाहिला आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये पु्ण्यातील बर्ड व्हॅली येथील सुंदर लेझर शो दाखवला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मनमोहक रंगबेरंगीमध्ये लेझर शो दिसेल. हा लेझर शो म्युझिकल फाउंटेनवर दाखवला जात असल्याने अधिक नयनरम्य वाटत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सायंकाळी ७.३० ते ८, पुण्यातील बर्ड व्हॅलीमध्ये होणारा सुंदर लेझर शो” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही येथे एकदा जावसं वाटेल.

iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील Bird Valley मध्ये होणारा सुंदर लेझर शो..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : मतदारांनो, मतदार यादीत नाव कसे तपासायचे? ‘वोटर हेल्पलाइन’ या मोबाइल अ‍ॅपद्वारे घरबसल्या जाणून घ्या

बर्ड व्हॅली उद्यान ( Bird Valley)

बर्ड व्हॅली हे पुण्यातील एक सुंदर उद्यान आहे. जे २००८ मध्ये सुरू करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड परिसरात असलेले हे उद्यान २६ एकर मध्ये व्यापलेले आहे. तेथील तलावात सुंदर पक्षी पाहायला मिळतात. येथे बोटींग सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. बर्ड व्हॅलीचा प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती फक्त १० /- रुपये आहे. दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे उद्यान सुरू असते. वरील व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की येथे एकदा भेट देऊ शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video bird valley udyan pimpri chinchwad pune laser light fountain show video goes viral on social media ndj