Pune : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. सांस्कृतिक शहर, शिक्षणाचं माहेरघर अशा अनेक नावांनी हे शहर ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, खाद्यसंस्कृती, पर्यटन स्थळे आणि पुणेरी पाट्या विशेष प्रसिद्ध आहे. तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असतील. सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या पुणेरी पाटीवर कोणाला टोमणा किंवा सुचना किंवा उपदेश केला नाही तर चक्क दु:ख व्यक्त केले आहे. ही पाटी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पाटी दिसेल या पाटीवर पांढऱ्या खडूने लिहिलेय, “जीवनात रस नाही. प्रेमात यश नाही. जायचं होतं अमेरिकेला पण स्वारगेटवरुन बस नाही” हे वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. कोणीतरी मजेशीरपणे दु:ख व्यक्त केल्याचे दिसतेय. सध्या या पाटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral video of a man stealing sugarcane from a sugarcane field and taking it off the train after stopping on the train is currently going viral
“अरे त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा तरी विचार करा” ट्रेन थांबताच प्रवाशांनी ऊसाच्या शेतात काय केलं पाहा; संतापजनक VIDEO व्हायरल
Little boy funny video after he was fail in exam I was in tension due to failure, but my friend also failed
शाळेत नापास झाला चिमुकला, म्हणाला “आधी टेन्शन होतं पण…” मंडळी मजेदार VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
a bride took an oath before marriage and said she will never say sorry to her husband
“लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video
Parrot talking in english fight with women funny video viral on social media
VIDEO: पोपटाची हुशारी पाहिली का? मालकिणीला सर्दी झाल्यानंतर लावतोय लाडीगोडी; अ‍ॅक्टींग पाहून पोट धरुन हसाल
Little girl conversation with his teacher to skip study funny video goe viral
“नको बया डोसक्याला ताप”; अभ्यास न करण्याचं चिमुकलीनं कोल्हापुरी स्टाईलमध्ये सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हेही वाचा : आजी नातूचं प्रेम! नऊवारीत आजीने केला नातवाबरोबर कपल डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

marathi_jokes_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ हा शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काही दिवस पुण्यात राहा. अमेरिकेपेक्षा जास्त मजा येईल पुण्यात” तर एका युजरने लिहिलेय, “हा ज्योक आमच्या कोल्हापूरच्या लोकांकडून चोरलेला आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुंबईवरुन ट्राय कर” ही पाटी वाचून अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडलेला दिसत आहे. काही युजर्सनी अमेरिकेपेक्षा पुणे बरे, असा सल्ला व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये दिलेला आहे.

ही पाटी शौचालयाबाहेरची पाटी आहे. यावर कोणीतरी खोडकर व्यक्तीनी हे सर्व लिहिलेलं आहे. पुण्यात असे बरेच प्रकार घडत असतात. याला पुणेरी पाटी नाही तर ज्योक म्हणता येईल. ज्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केलेला आहे, त्या अकाउंटवर पुण्यातील असे मजेशीर व्हिडीओ शेअर केले आहे.

Story img Loader