Christmas Celebration on MG Road Pune : ख्रिसमस हा जगातील सर्वांत लोकप्रिय सणांपैकी एक आहे. दरवर्षी २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सन्मानार्थ हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी, रस्त्यांवर सुंदर लायटिंग, मेणबत्त्या व ख्रिसमसचे झाड सुंदर रित्या सजवतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. एकमेकांना गोडधोड आणि गिफ्ट्स भेट म्हणून देतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने ख्रिसमस साजरा करतात. सोशल मीडियावर आज अनेक ठिकाणचे ख्रिसमस सेलीब्रेशनचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या पुण्यातील एमजी रोडवरील काही व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एमजी रोडवरील ख्रिसमस सेलीब्रेशन दाखवले आहे. (Pune Video Christmas Celebration on MG Road Pune video goes viral on social media)

हेही वाचा : VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

काय होत आहे व्हायरल? पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये पुणे शहरातील एमजी रोडचा परिसर दाखवला आहे. हा व्हिडीओ २४ डिसेंबरच्या रात्रीचा आहे. लोक रस्त्यावर लाल फुगे हातात घेऊन उभे आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आनंद साजरा करताना दिसत आहे. रस्त्यांवर लोकांची भयंकर गर्दी आहे. रस्त्याच्या कडेला फुगे, लाल टोपी विक्रेता बसलेले दिसत आहे.

एमजी कॅम्प रोडवरील एक आणखी व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोक आकाशात लाल फुगे सोडत ख्रिसमस साजरा करताना दिसत आहे. धार्मिक समरसता दिसून येत आहे.

हेही वाचा : बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?

नेटकरी काय म्हणतात?

pune_shehar आणि puneopedia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एमजी रोडवरील ख्रिसमस सेलीब्रेशन” या दोन्ही व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुणे हे एक वैविध्यपूर्ण शहर आहे. पुण्यात प्रत्येक सण साजरा करण्यासाठी स्वतःचा रस्ता असतो. हिंदू सणांचा विचार केला तर पुण्यात सदाशिव पेठ, नवीन वर्षासाठी फर्ग्युसन कॉलेज रोड आणि ख्रिसमससाठी एमजी रोड आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “ही धार्मिक समरसता आहे ही चांगली गोष्ट आहे “

Story img Loader