Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे या शहराचा इतिहास सांगतात. येथील शिक्षण, पुणेरी भाषा ही या शहराची ओळख आहे. दुरुवरून हजारो तरुण मुले मुली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी पुण्यात येतात. सणावाराला पुण्यात भरपूर येणाऱ्या जाणाऱ्यांची भरपूर गर्दी दिसून येते. सध्या दिवाळी सुरू आहे त्यामुळे अनेक जण गावाकडे जात आहे. अशातच पुण्यातील रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील रेल्वेस्टेशनवर लोकांची भयंकर गर्दी दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही घराबाहेर पडण्यास विचार कराल. (pune video : crowd at pune railway station video goes viral on social media)

पुणे रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुणे रेल्वेस्टेशन दिसेल. या स्टेशनवर लोकांची भयंकर गर्दी दिसून येत आहे. लोक रेल्वेमध्ये चढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. अशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दिसून येत आहे जे तेथील परिस्थिती हाताळताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला काही निवडक लोक रेल्वेमध्ये चढताना दिसत आहे आणि पोलीस अधिकारी काही लोकांना बाजूला उभे करत आहे. गर्दी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही घराबाहेर पडण्याचा विचार कराल.

हेही वाचा : China’s Richest Zhang Yiming’s Wealth : चीनच्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीची संपत्ती माहितेय का? मुकेश अबांनींच्या तुलेनत…

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

punetravelx या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे रेल्वेस्टेशनवर दिवाळीची गर्दी”

हेही वाचा : Video : “आताच्या पोरांना काय कळणार आहे दिवाळी म्हणजे काय असते?” 90’sच्या तरुणाने सांगितल्या जुन्या आठवणी

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हेच ते स्वतःला पुणेकर म्हणणारे….” तर एका युजरने लिहिलेय, ” तर एका युजरने लिहिलेय, “असं वाटतं की निम्म तरी पुणे रिकामे होईल” आणि एका युजरने लिहिलेय, “हे सगळे नॉन-पुणेकर आहेत…हे बरोबर सणासुदीला बाहेर पडतात…” एक युजर लिहितो, “भाऊ हे यूपी बिहार ला जाणारे लोकच आहे.” तर एक युजर लिहितो, “पुण्या बाहेरचे लोक आहेत ते”