Dancing Pohe Pune Viral Video : पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. पुण्याला प्रचंड मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील संस्कृती, भाषा, शिक्षण, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले इत्यादी गोष्टी पुण्याची ओळख सांगतात. पुणेरी पाट्यापासून तर खाद्यसंस्कृतीपर्यंत अनेक गोष्टी नेहमी चर्चेत येतात. पुण्यात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे अनेक लोकप्रिय ठिकाणे आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील डांसिंग पोहेवाले काकांविषयी सांगितले आहे. तुम्ही येथील पोहे कधी खाल्ले आहे का?

पुण्यातील Dancing पोहेवाले!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक काका दिसतील. हे काका पोहे बनवताना दिसत आहे. या काकांचे नाव प्रवीण शिवाजी पाटील आहे. ते मूळचे जळगावचे. त्यांची पत्नी आणि ते हा स्टॉल चालवतात. सकाळी नाश्त्याला पोहे, साबुदाणा खिचडी मिळते तर जेवणात पिठलं भाकरी, वागं भरीत भाकरी, कढी खिचडी, सन्डे स्पेशल दालबाटी इत्यादी खानदेशी पदार्थ मिळतात.
काका या व्हिडीओमध्ये सांगतात, “माझे वडील पण हेच काम करतात. आम्ही आमच्या घरातूनच हा व्यवसाय सुरू केला. काही लोक वायब्रेटींग पोहेवाले म्हणतात तर काही लोक डांसिंग पोहेवाले म्हणतात. छान वाटतं. कुणाला खाऊ घालताना एकदम आनंद वाटतो. पोरांचंही प्रेम आहे”

a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
a child girl presents amazing Bharatanatyam classical Indian dance video goes viral
Video : चिमुकलीने सादर केले अप्रतिम भरतनाट्यम, चेहऱ्यावरील हावभाव अन् डोळ्यांची हालचाल…; Video एकदा पाहाच
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic dance on chaar kadam Song
Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा सुशांत सिंह राजपूत आणि अनुष्का शर्माच्या ‘या’ गाण्यावर रोमँटिक डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : Video : “अक्षय का विषय बहोत हार्ड है!”, अंघोळीला वैतागलेल्या चिमुकल्याने तयार केला भन्नाट रॅप; एकदा ऐकाचं, पोट धरून हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Independence Day 2024 Wishes : ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त प्रियजनांना Texts, WhatsApp Messages द्वारे खास मराठीतून पाठवा शुभेच्छा, पाहा यादी

rajashri_katkar_vlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील Viral Dancing पोहेवाले” या कॅप्शनमध्ये पत्ता सुद्धा सांगितला आहे, “श्री स्वामी कृपा पोहा सेंटर,कर्वे नगर, कमिंस कॉलेजजवळ, पुणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खुप छान आहेत काका” तर एका युजरने लिहिलेय, “यांची साबुदाणा खिचडी आणि पोहे खरंच खूप अप्रतिम आहेत. अतिशय स्वस्त आणि प्रचंड चवदार आहेत.” आणखी एका युजरने लिहिलेय, “अभिमान वाटतो आपला. जळगाव चे नाव रोशन केले” एक युजर लिहितो, “जळगावकर मग काय विषयच नाही….. प्रेम तर भेटणारच…” अनेकांनी हा व्हिडीओ पाहून या काकांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader