Pune Video : येत्या काही दिवसांवर दिवाळी सण आहे. त्यामुळे सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी दिवाळीसाठी घराची साफसफाई, खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी दिसून येत आहे. घरात लाडू चिवडा, चकली इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरू आहे तर काही लोक शहरातून गावाकडे दिवाळी साजरी करण्याकरीता जाण्याची तयारी करत आहे. सध्या अशातच पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील लक्ष्मी रोड दाखवला आहे. लक्ष्मी रोडचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

लक्ष्मी रोडने वेधले सर्वांचे लक्ष

या व्हायल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील लक्ष्मी रोड दिसेल जिथे नेहमीसारखीच गर्दी आहे पण नेहमीपेक्षा हा रोड जरा वेगळा आणि आकर्षक दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला खूप सुंदर लाइटिंग दिसून येईल जणू काही लाइटिंगचा पाऊस पडला आहे, असे तुम्हाला वाटेल. लक्ष्मी रोडवरील हे दृश्य सध्या येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

best masala dudh in pune
Pune Video : पुण्यात वर्षभर मिळते येथे एक नंबर मसाला दूध, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Rahul Gandhi Reaction on Baba Siddique Death
Baba Siddique : बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या, राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “ही घटना…”
Ratan Tata Death Garba stopped in between to pay tribute to the Ratan Tata
VIDEO: टाटांचा श्वास थांबला अन् गरब्यातील सळसळती पावलंही; निधनाची बातमी ऐकताच मुंबईकरांनी अक्षरश: हात जोडले
Emotional video : when middle class boy go to the jnv hostel by leaving home
जेव्हा मध्यमवर्गीय घरातील मुलगा घर सोडून JNV च्या होस्टेलवर राहायला जातो; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
Groom dance for his wife in pune on Bhetal Java Gunyat Mala Atak Kara Punyat song
“जेव्हा नवरदेवाला मनासारखी बायको भेटते..” पुण्यात तरुण नाचता नाचता कुठे पोहचला पाहा; VIDEO होतोय व्हायरल
An innocent girl student danced in class while everyone closed their eyes
बालपण देगा देवा! वर्गात सुरु होती प्रार्थना अन् डोळे मिटून चिमुकली एकटीच नाचत होती, गोंडस Video एकदा पाहाच
Punekar dancers
पुण्याचा विषयच भारी! या अतरंगी पुणेकर डान्सर्सनी वेधले सर्वांचे लक्ष, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : फक्त ८ वी शिकून झाले कोटींचे मालक, प्रसिद्ध कौटुंबिक व्यवसाय सोडला अन्…, वाचा शिवरतन अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

पाहा व्हायरल व्हिडीओ

foodie_panda28 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लक्ष्मी रोडवरील दिवाळी वाइब्स” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मागच्या वर्षी सुद्धा असाच सजवला होता हा रोड” तर एका युजरने लिहिलेय, “पुण्यात दिवाळी सुरू झाली” आणखी एका युजरने लिहिलेय, “पुणे हे शहर सणावारांचे आहे.” एक युजर लिहितो, “लक्ष्मी रोडवर मरणाची गर्दी असते.” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : जीव गेला तरी चालेल, पण Video बनवणारचं! अपघातानंतर डोक्यातून वाहतय रक्त, पण मोबाइल काही सोडला नाही; यूट्यूबरचा धक्कादायक प्रताप

याशिवाय लक्ष्मी रोडचे इतर काही व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहेत.

यापूर्वीही पुण्यातील असे अनेक दिवाळीच्या डेकोरेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लक्ष्मी रोडच्या डेकोरेशनचे व्हिडीओ दरवर्षी चर्चेत येतात.

हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते. या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. यंदा दिवाळी २०२४ मध्ये, २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशीपासून ३ नोव्हेंबर भाऊबीजपर्यंत साजरी केली जाणार. यंदा २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी आणि ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी छोटी दिवाळी दरम्यान एक दिवसाचे अंतर असेल.