Pune Video : येत्या काही दिवसांवर दिवाळी सण आहे. त्यामुळे सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी दिवाळीसाठी घराची साफसफाई, खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी दिसून येत आहे. घरात लाडू चिवडा, चकली इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरू आहे तर काही लोक शहरातून गावाकडे दिवाळी साजरी करण्याकरीता जाण्याची तयारी करत आहे. सध्या अशातच पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील लक्ष्मी रोड दाखवला आहे. लक्ष्मी रोडचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

लक्ष्मी रोडने वेधले सर्वांचे लक्ष

या व्हायल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील लक्ष्मी रोड दिसेल जिथे नेहमीसारखीच गर्दी आहे पण नेहमीपेक्षा हा रोड जरा वेगळा आणि आकर्षक दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला खूप सुंदर लाइटिंग दिसून येईल जणू काही लाइटिंगचा पाऊस पडला आहे, असे तुम्हाला वाटेल. लक्ष्मी रोडवरील हे दृश्य सध्या येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : फक्त ८ वी शिकून झाले कोटींचे मालक, प्रसिद्ध कौटुंबिक व्यवसाय सोडला अन्…, वाचा शिवरतन अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

पाहा व्हायरल व्हिडीओ

foodie_panda28 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लक्ष्मी रोडवरील दिवाळी वाइब्स” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मागच्या वर्षी सुद्धा असाच सजवला होता हा रोड” तर एका युजरने लिहिलेय, “पुण्यात दिवाळी सुरू झाली” आणखी एका युजरने लिहिलेय, “पुणे हे शहर सणावारांचे आहे.” एक युजर लिहितो, “लक्ष्मी रोडवर मरणाची गर्दी असते.” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : जीव गेला तरी चालेल, पण Video बनवणारचं! अपघातानंतर डोक्यातून वाहतय रक्त, पण मोबाइल काही सोडला नाही; यूट्यूबरचा धक्कादायक प्रताप

याशिवाय लक्ष्मी रोडचे इतर काही व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहेत.

यापूर्वीही पुण्यातील असे अनेक दिवाळीच्या डेकोरेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लक्ष्मी रोडच्या डेकोरेशनचे व्हिडीओ दरवर्षी चर्चेत येतात.

हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते. या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. यंदा दिवाळी २०२४ मध्ये, २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशीपासून ३ नोव्हेंबर भाऊबीजपर्यंत साजरी केली जाणार. यंदा २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी आणि ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी छोटी दिवाळी दरम्यान एक दिवसाचे अंतर असेल.