Pune Video : महाराष्ट्रातील सुंदर शहरांपैकी एक शहर म्हणजे पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर, ऐतिहासिक शहर अशा अनेक नावाने पुणे हे शहर ओळखले जाते. पुणे शहराचे आगळी वेगळी ओळख आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, संस्कृती, भाषा, पुणेरी पाट्या, एवढेच काय तर येथील खाद्य संस्कृती सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. दर दिवशी हजारो लोक पुणे दर्शनाला येतात आणि नव्याने पुणे शहर अनुभवतात. असे अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत जेथे लोक आवर्जून भेट देतात.

तुम्हाला माहीत आहे का पुण्यातील काही ठराविक ठिकाणे काही चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुण्यातील प्रसिद्ध मटकी भेळ विषयी सांगितले आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!

हेही वाचा : “मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” चिमुकलीने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल

पुण्यातील सर्वात प्रसिद्ध मटकी भेळ

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक काकू अत्यंत स्वादिष्ट मटकी भेळ तयार करताना दिसेल. या मटकी भेळ चा व्हिडिओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की काकू मटकी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, फरसाण, चुरमुरे आणि काही मसाले टाकून अत्यंत चविष्ट अशी भेळ तयार करतात. आणि त्यानंतर ही भेळ ग्राहकांना सर्व्ह करताना दिसतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि ही स्वादिष्ट भेळ पुण्यात नेमकी कुठे खायला मिळेल?
या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ एमजी रोड कॅम्प जवळचा आहे. आंबेडकर सर्कलच्या जवळ तुम्हाला या मटकी भेळचा स्टॉल दिसेल. विशेष म्हणजे फक्त ६० रुपयांमध्ये तुम्हाला या मटकी भेळचा आस्वाद घेता येतो.

पाहा व्हायरल व्हिडीओ

oyehoyeindia या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या स्टॉलचा पत्ता व मटकी भेळची किंमत सांगितली आहे.

हेही वाचा : ही दोस्ती तुटायची नाय! सुख म्हणजे मित्रांबरोबर निवांत बसून गप्पा मारणे; वृद्ध मित्रांचा हा सुंदर VIDEO एकदा पाहाच

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” स्वच्छ आहे आणि भेळ पण छान आहे चवीला.” तर एका युजरने लिहिलेय, “पुण्यातील ही सर्वात स्वादिष्ट मटकी भेळ आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, ” या भेळची चव कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही” अनेक युजर्सनी या भेळविषयी सकारात्मक प्रतिासाद दिला आहे.