Pune Viral Video : पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहराचा इतिहास खूप मोठा आहे. विद्येचे माहेरघर असलेले पुणे फक्त शिक्षणासाठी नव्हे तर याशिवाय ऐतिहासिक वास्तु व प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. शहराजवळचे गडकिल्ले व नैसर्गिक सौंदर्यामुळे या शहराच्या सुंदरतेत आणखी भर पडते. दरदिवशी हजारो लोक पुणे दर्शनासाठी येतात. (Pune Sarasbaug’s viral video : Stunning Beauty of sarasbaug – pune famous place)

पुण्यातील काही खास ठिकाणी आवर्जून भेट देतात. शनिवारवाडा, लाल महाल, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सिंहगड, खडकवासला धरण, आगाखान पॅलेस, सारसबाग इत्यादी. सोशल मीडियावर सुद्धा या ठिकाणचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सारसबागचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सारसबागचा सुंदर परिसर दाखवला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Shocking Video : Pune PMT Bus Front Glass falls off due to high speed
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले
Shocking video dehradun raipur two girls fight for boy friend video viral on social media
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”

हेही वाचा : “आयुष्य एवढं सहज मिळतं का?” रीलसाठी तरुणानं धावत्या बाईकवर काय केलं पाहा; VIDEO पाहून संतापले लोक

सारसबागचं सौंदर्य

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सारसबागचा सुंदर परिसर दिसेल. सारसबाग येथील हिरवी बाग, ठीक ठिकाणी पाण्याचे कारंजे दिसतील. सुंदर तलाव दिसेल. एक छोटा झरा दिसेल. त्यानंतर पुढे व्हिडीओत सारसबागचा गणपती दाखवला आहे. सारसबागचा गणपती अतिशय सुंदर असून मंदिराच्या आजुबाजूचा परिसर देखील तितकाच मनमोहक आहे. सारसबागमध्ये अनेक ठिकाणी लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. सारसबागची भेळ सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे. लोक आवर्जून येथील भेळ खायला येतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

whatsinpune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सारसबाग- पुण्यातील सुंदर अशी जागा आहे. तुम्हाला शांत अशा ठिकाणाचा आनंद घ्यायचा असेल, ऐतिहासिक गणपती मंदिरात जायचे असेल किंवा हिरव्यागार वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर ही सुंदर सारसबाग तुम्हाला शहराच्या गर्दीतून मोकळा श्वास घेण्यास मदत करते.”

हेही वाचा : “कोण म्हणतं बहीण-भावाचं नातं आयुष्यभर टिकत नाही…” वृद्ध बहीण-भावाचं अतूट प्रेम दाखवणारा भावनिक VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मी नेहमी सारसबागेत जातो.” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader