Viral Video : पुणे हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू आणि प्राचीन मंदिरे येथील संस्कृतीची ओळख सांगतात. पुण्याचे शिक्षण असो किंवा पुणेरी भाषा, पुणेरी पाट्या असो किंवा पुण्याची खाद्यसंस्कृती नेहमी चर्चेचा विषय असतो. शिक्षण आणि नोकरीमुळे अनेक तरुण मंडळी पुण्यात येतात. त्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी तरुण मंडळी दिसून येतात. पुण्याच्या सार्वजनिक बाल्कनीत तर हे तरुण मंडळी सायंकाळीच्या वेळी किंवा सकाळी पहाटेच्या वेळी बसलेले दिसतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुण्याची सार्वजनिक बाल्कनी आहे कुठे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
पुणेकरांची सार्वजनिक बाल्कनी माहितीये का?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका अनेक तरुण मंडळी रस्त्यावर बसलेले दिसत आहे. हा रस्ता उड्डाण पुलावरचा आहे. तुम्हाला वाटेल ही सार्वजनिक बाल्कनी आहे तरी कुठे?
हा व्हिडीओ पुण्यातील चांदणी चौकातील आहे. चांदणी चौकातील उड्डाण पुल बांधताना थोडी जागा शिल्लक होती. तीच ही जागा, सध्या पुण्यातील सार्वजनिक बाल्कनी म्हणून ओळखली जाते. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुणेकरांची सार्वजानिक बाल्कनी , गेला आहात का कधी?”
पाहा व्हायरल व्हिडीओ
iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “” पुणेकरांची सार्वजनिक Balcony…”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फक्त कोणी कचरा करू नये म्हणजे झालं” तर एका युजरने लिहिलेय, “असलं काही नाही बाबांनो, तिथं लॉन्स करणारे, झाडे लावणारे नंतर सगळ्यांसाठी बंद करणार आहेत…..” आणखी एका युजरने लिहिलेय, “बिचारे पुण्याचे लोक व्हू पण बघितला काय तर हायवे रोड. आमची मुंबई, थेट समुद्रा समोर बसून दोन बिअर हातात असतात. वाइब आहेत आमच्या मुंबईत” काही युजर्सनी टीका सुद्धा केली आहेत.
पुण्यातील असे अनेक ठिकाणे आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येतात. सोशल मीडियावर कधी या ठिकाणांचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी फूड स्टॉलचे ठिकाण तर कधी सुंदर निसर्गरम्य ठिकाण. असेच हे ठिकाण जिथे पुणेकर क्षणभर विश्रांती घेण्यासाठी येतात.