Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय सुंदर शहरांपैकी एक शहर आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून या शहराची आगळी वेगळी ओळख आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, जुने वाडे या शहराचा इतिहास सांगतात. पुण्यात दर दिवशी हजारो लोक पुणे दर्शनासाठी येतात. पुण्यात असे अनेक जुनी नवी ठिकाणे आहेत जे शहराच्या सुंदरतेत आणखी भर टाकतात. पण काही ठिकाणे अशी आहेत, ज्याविषयी अजूनही लोकांना माहिती नाही.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एका सुंदर मंदिराविषयी सांगितले आहे. पुण्यातील एकमेव असं श्रीमद् भगवत गीता मंदिर तुम्ही पाहिले आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या मंदिराविषयी माहिती सांगितली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Pune Video do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune where is it watch viral video)
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीमद्भागवत गीता मंदिराचा भव्य परिसर दिसेल. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला मंदिराचे द्वार दिसेल. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर व शांत आहे. मंदिराच्या दरवाज्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. या मंदिरात श्रीमद् भगवत गीतेचं दर्शन होईल मंदिर आणि पांडवांच्या स्वर्गारोहणाच्या भव्य मूर्ती तुम्हाला दिसेल. मंदिर पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि एकदा तरी या ठिकाणी तुम्हाला भेट द्यावीशी वाटेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
our_punecity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यापासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर, लोणी काळभोर येथे वसलेल्या MIT World Peace University च्या हिरव्यागार कॅम्पसमध्ये लपलेला आहे एक अद्भुत खजिना. येथील भव्य श्रीमद् भगवत गीतेचं मंदिर आणि पांडवांच्या स्वर्गारोहणाची भव्य मूर्ती हे दोन्ही एकाच ठिकाणी पाहण्याचा योग तुम्हाला इथेच मिळेल!
श्रीमद् भगवत गीता मंदिराच्या पावन परिसरातून वाहणारी शीतल वाऱ्याची झुळूक, हिरव्यागार वृक्षांची सावली आणि पक्ष्यांची किलबिल, तुमच्या मनाला एक वेगळीच प्रसन्नता देईल.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “याच कॅम्पसमध्ये राज कपूर यांचे म्युझियम सुद्धा आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी येथे जाऊन आलोय. १०० रुपये तिकिट आहे पण खूप सुंदर आहे”