Pune Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून कधी पुणेरी पाट्या, कधी पुणेरी खाद्यपदार्थ, येथील संस्कृती, गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू व प्राचीन मंदिरे इत्यादी हटके गोष्टींविषयी माहिती सांगितली जाते. पुणे शहर व त्याच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय सुंदर असून दर दिवशी हजारो लोक पुणे दर्शनाला येतात. पण पुण्याजवळ असे अनेक ठिकाणी आहेत ज्याविषयी अनेक लोकांना माहिती नाही.

आज आपण अशाच एका जवळच्या एका सनसेट पॉईंट विषयी जाणून घेणार आहोत. हा पुण्याजवळचा सर्वोत्तम व सुंदर असा सनसेट पॉईंट आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सनसेट पॉइंट कुठे आहे? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी या सनसेट पॉईंट विषयी माहिती सांगताना दिसते.

हेही वाचा : “पालकांबरोबर राहताना WFH करणे म्हणजे Squid Game..” तरुणाच्या पोस्टमुळे भडकले नेटकरी, एक्सवर पेटला नवा वाद, पाहा Viral Post

या व्हिडिओमध्ये तरुणी सांगते, “पुण्याजवळचा सर्वोत्तम सनसेट मी येथे बघितला होता. चतुर्मुख शिवमंदिर. पुण्यापासून फक्त २०-२५ किलोमीटर लांब असलेले हे मंदिर प्राचीन असून आजूबाजूचा परिसर छोट्या छोट्या टेकड्यांनी भरलेला आहे, त्यामुळे इथल्या परिसरात शांत वातावरण अनुभवता येतं. याच मंदिरामागे असलेल्या टेकडीवरून मी सूर्यास्त पहिला होता. एकांत शांतता आणि निसर्ग अजून काय पाहिजे आयुष्यात.. शिवापूर रस्त्यावरून डावीकडे जाणारा पठार भाग पाथरवाडी कडे स्थित आहे. घाट चढून गेल्यावर येथेच मध्यभागी हे मंदिर आहे. आज डोंगराला ब्रह्मगिरी किंवा चतुर्मुख डोंगर असे सुद्धा म्हणतात. असं म्हटलं जातं की स्वतः ब्रह्मदेवाने येथे ध्यान केले होते. संध्याकाळची वेळ होती. जवळपास चार वाजता गाडी काढली आणि निघाले शिवापूर कडे आणि मग वळले या मंदिराकडे जायला. घाट चढायला सुरुवात करताच हे सुंदर झाडे बघून येथेच थांबायचं मन झालं होतं पण प्रवास आणि ठिकाण हे यावेळी तेवढेच सुंदर होते. तुम्ही चतुर्मुख शिव मंदिराला सकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत भेट देऊ शकता. या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

पूर्वा किने असे या तरुणीचे नाव असून bhatkanti_bypurwa या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चतुर्मुख शिव मंदिरला कसं पोहोचायचं?

१. कोंढवा आणि बोपदेव घाट (२५ किमी): पुण्याहून निघा आणि कोंढव्याकडे जा, नंतर बोपदेव घाटातून प्रवास सुरू ठेवा. पाथरवाडीतील चतुर्मुख शिव मंदिरात पोहोचेपर्यंत २५ किमी पसरलेल्या चित्तथरारक मार्गाचा आनंद घ्या.

हेही वाचा : VIDEO: “जेव्हा सासूला आवडती सून भेटते” सुनेच्या स्वागतासाठी सासूबाईंनी केला भन्नाट डान्स; वऱ्हाडीही राहिले बघत

२. सासवड ते पाथरवाडी (२० किमी): तुमचा नयनरम्य प्रवास सासवड ते कोडीत आणि नंतर पाथरवाडीकडे जा.
२० किमी अंतर कापून, चतुर्मुख शिव मंदिरापर्यंत पोहोचण्यापूर्वी हा मार्ग शांत ग्रामीण भागाची दृश्ये देतो.

३. शिवापूर मार्गे (३५ किमी): पुण्याहून पुणे-बंगळूरू महामार्गाने शिवापूरच्या दिशेने प्रवास सुरू करा. तेथून ३५ किमी अंतर कापून पाथरवाडीकडे जा.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर जागा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “चतुर्मुख महादेव मंदिर दरेवाडी पुणे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर ठिकाण आहे मी नक्की जाणार.”