Pune Viral Video : पुण्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. काही मंदिरे इतकी लोकप्रिय आहे की ही मंदिरे बघण्यासाठी दुरवरून लोक येतात. सोशल मीडियावर पुण्यातील अनेक मंदिराविषयी माहिती सांगितली जाते. तुम्ही आजवर अनेक मंदिरांचे व्हिडीओ पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील श्री हनुमानाच्या मंदिराविषयी सांगितले आहे. तुम्ही श्री हनुमानाचे हे सुंदर मंदिर बघितले आहे का? हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. (Pune Video do you see a beautiful hanuman temple in pune video goes viral on social media)
हेही वाचा : थार चालकाचे भररस्त्या9त धक्कादायक कृत्य, कारच्या छतावर टाकली माती अन्…Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई
पुण्यातील श्री हनुमानाचे सुंदर मंदिर (a beautiful hanuman temple in pune )
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसेल. या मंदिराच्या बाहेर श्री हनुमानाची भव्य मूर्ती दिसत आहे. ही भव्य मूर्ती अतिशय आकर्षक असून मंदिराची शोभा वाढवत आहे. या मूर्तीमागे असलेले मंदिर सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहे. मंदिराच्या आत दत्तगुरूची मूर्ती विराजमान आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या ठिकाणी एकदा भेट द्यावीशी वाटेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यातील श्री हनुमानाचे हे सुंदर मंदिर तुम्ही बघितले का?” हे मंदिर पुण्याजवळ असलेल्या गहुंजे येथे साई नगर रोडला स्थित आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
pune_captures या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकरांनो तुम्ही हे मंदिर नक्कीच बघितले नसेल ! ठिकाणाचे नाव – श्री हनुमान मंदिर, साईनगर रोड, गहुंजे, देहू रोड महाराष्ट्र -४१२१०१”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एमसीए क्रिकेट स्टेडियमकडे जाताना मी पाहिले आहे हे मंदिर” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर मंदिर आहे” आणखी अनेक युजर्सनी कमेंट्मध्ये “जय श्री राम”च्या घोषणा दिल्या आहे.