Viral Video : पुण्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, पीएमटी बस, ऑटो रिक्षा, पुणेरी पाट्या, खाद्यपदार्थ विशेष चर्चेत येतात. पण सध्या पुण्यात एक ऑटोरिक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ऑटो रिक्षेत असं काय खास आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
पुण्यात नवीन रिक्षाची चर्चा! तुम्ही कधी या रिक्षामध्ये बसलात का? (news auto rickshaw in pune)
या व्हायरल व्हिडीओ मध्ये तुम्हाला पुण्याच्या रस्त्यावरून फिरणारी एक अनोखी ऑटो रिक्षा दिसेल. ही रिक्षा इतर रिक्षेप्रमाणे दिसत आहे. या रिक्षेचे रंगरूप, डिझाइन मॉडेल सर्व वेगळे आहे. ही रिक्षा अधिक आकर्षक आणि हटके दिसत आहे. या रिक्षा रेड वाइन रंगाची असून या रिक्षेला काळ्या कापडाचे रूफ लावले आहे. या रिक्षेला आकर्षक बनवण्यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे. हे काका ही सुंदर रिक्षा चालवताना दिसत आहे. या रिक्षेचा नंबर mh12ah |0586 असा आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यातील या युनिक रिक्षामध्ये कधी बसला आहात का?
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
ek_puneri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणी कोणी बघितली आहे ही रिक्षा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वारजे माळवाडी परिसर” तर एका युजरने लिहिलेय, “धायरेश्वर ट्रॅवल्सचे ओनर कृष्णा मारणे यांची आहे ही रिक्षा…सगळ्यात पहिली गाडी आहे त्यांची ही,तिथपासून जवळ जवळ आता ५० बस आहेत त्यांच्या कडे. ह्या गाडीला लक्ष्मी म्हणतात ते म्हणून तिला बनवून घेतले आहे.
मुळशीतील आंदगावच्या आटाळवाडीतील अतिशय कष्टातून मोठे झालेले हे कुटुंब..” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर रिक्षा, कोणालाही बसावसं वाटतं” अनेक युजर्सनी हार्टचे इमोशी शेअर केले आहेत.