Viral Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ अगदी थक्क करणारे असतात. पुणे शहराचा खूप मोठा इतिहास आहे. येथील ऐतिहासिक वास्तू प्राचीन मंदिरे आजही चर्चेचे विषय असतात. अनेक लोक पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंना आणि मंदिरांना भेट देण्यासाठी दूरवरुन येतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड पासून अवघ्या २० किलोमीटरवर डोंगरावर स्थित देवीच्या मंदिराचा सुंदर परिसर दाखवला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही या ठिकाणी भेट द्यावीशी वाटेल.

पिंपरी चिंचवडला पुण्याचे जुळे शहर सुद्धा म्हटले जाते. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख आहे. पिंपरी चिंचवड पासून अवघ्या २० किलोमीटरवर एक मंदिर आहे. वरील व्हायरल व्हिडिओमध्ये या मंदिराचा सुंदर परिसर दाखवला आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की हे मंदिर उंच टेकडीवर आहे. या मंदिराचे नाव चौराई देवी मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे सुंदर मंदिर कदाचित अनेकांना ठाऊक नाही. या मंदिराच्या सभोवताली हिरवे झाडेझुडपे आणि नयनरम्य निसर्ग आहे. उंच डोंगरावर स्थित असलेल्या मंदिरातून पिंपरी चिंचवडसह पुणे शहराचे सुंदर दृश्य दिसून येते. हे मंदिर सोमाटणे फाटा जवळ आहे.

Ursekarwadi, Dombivli, Skywalk staircase,
डोंबिवलीत उर्सेकरवाडीमधील स्कायवॉक जिन्याच्या पायऱ्यांवर प्रवाशांची घसरगुंडी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या

हेही वाचा : ‘बाप्पा नाही फोटो महत्त्वाचा…’ बाप्पाला पाहताच दर्शन घेण्याआधीच बघ्यांनी काढले फोटो; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट

पाहा व्हायरल व्हिडिओ

pcmc.merijaan या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” सोमाटणे जवळ डोंगरावर स्थित असलेले हे चौराई देवी मंदिर तुम्हाला माहीत आहे? का पिंपरी चिंचवड पासून अंतर अंदाजे २० किलोमीटर आहे. मंदिरापर्यंत जायला पंधरा-वीस मिनिट ट्रेक करावा लागतो. (वयस्कर व हार्ट पेशंट असलेल्यांनी येथे जाणे टाळावे)”

हेही वाचा : BJP Astrological Prediction 2024: ‘विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाची अवस्था बिकट, पुन्हा अटलजींच्या…’ ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर जागा आहे. अप्रतिम” तर एका युजरने लिहिलेय, ” सर्वात मस्त ट्रेकिंग पॉईंट आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, ठआम्ही जाऊन आलो आहोत, चौराई देवी मंदिर सोमाटणे” एक युजर लिहितो,” मस्त. पुण्यामध्ये राहून सुद्धा मी कधी पाहिले नाही.” तर एक युजर लिहितो, “मी गेलो होतो खूप चालत जावं लागतं. पाय खूप दुखत होते पण छान वाटलं दर्शन घेतल्यानंतर.”

Story img Loader