Pune Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर असून येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, शिक्षण, संस्कृती या शहराची ओळख आहे. दरदिवशी हजारो लोक पुणे दर्शनाला येतात. येथील काही लोकप्रिय ठिकाणे जसे की दगडूशेठ मंदिर, लाल महाल, शनिवारवाडा, सिंहगड, इत्यादी ठिकाणांना भेट देतात पण पुण्यात आणि पुण्याजवळ असे अनेक ठिकाणे आहेत, ज्याशिवाय अनेकांना माहिती नाही. तुम्ही कधी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं व पुण्यापासून अगदी जवळ असलेलं काशी विश्वनाथाचं मंदिर पाहिलं आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या सुंदर मंदिराविषयी माहिती सांगितली आहे. (Pune Video do you see kashi Vishwanath mandir 25 km away from pune video goes viral on social media)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसेल. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. हे मंदिर पुण्यापासून अगदी २५ किमी अंतरावर स्थित आहे. हे महादेवाचं मंदिर बघण्यासाठी दुरुवरून लोक येतात. येथील पिंडीचा आकार काशी विश्वनाथाच्या पिडींच्या आकारासारखाच आहे. म्हणून या मंदिराला काशी विश्वनाथाचं मंदिर असं म्हणतात.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे – मंदिराचे बांधकाम अतिशय जुने असून मंदिराची रचना प्राचीन मंदिराप्रमाणे आहे. मंदिराच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर तुम्हाला समोरच नंदीचे दर्शन होईल. मंदिराचा कळस उंच आणि आकर्षक आहे. मंदिराच्या परिसरात सुंदर तुळस आहे. मंदिराच्या आत काळ्या दगडात कोरलेली महादेवाची पिंड आहे. येथे तुम्हाल हनुमानाची मुर्ती सुद्धा दिसेल. मंदिराचा परिसर अतिशय विलोभनीय आहे.

suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video of three girls smoke cigarette for reels viral video on social media
सिगारेट घेतली अन्…, एका रीलसाठी तिघींनी ओलांडली मर्यादा! VIDEO पाहून बसेल धक्का
a bride said amazing ukhana
VIDEO : याला म्हणतात फॅमिली उखाणा! नवरीने सासू-सासऱ्यांपासून नणंद-दीरापर्यंत सर्वांची केली प्रशंसा; म्हणाली, “पुरण पोळी पुरणाशिवाय काही गोड नाही…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
ameya khopkar slams suresh dhas over prajakta mali
“तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप
badlapur sexual assault case
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर पुन्हा हादरलं! मैत्रिणीने मद्य पाजले, मग रिक्षाचालकाने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार

हेही वाचा : ‘हिरो चित्रपटात नव्हे तर खऱ्या आयुष्यात भेटतात!’, तारेत अडकलेल्या कबुतराचा तरुणाने वाचवला जीव; Viral Video एकदा बघा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : VIDEO : याला म्हणतात फॅमिली उखाणा! नवरीने सासू-सासऱ्यांपासून नणद-दीरापर्यंत सर्वांची केली प्रशंसा; म्हणाली, “पुरण पोळी पुरणाशिवाय काही गोड नाही…”

pune_trending_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यापासून फक्त २५ किमीवर काशी विश्वनाथाचं मंदिर.. निसर्गाच्या सानिध्यात आणि मन प्रसन्न करणारं वातावरण” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुणे सासवड जवळ हिवरे गावात हे सुंदर मंदिर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “आम्ही गेलो आहोत. खूप सुंदर मंदिर आहे”

Story img Loader