Pune Viral Video : पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे आणि महाराष्ट्रीय संस्कृती या शहराची ओळख आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराला ओळखले जाते. पुण्यात अनेक देवी देवतांचे मंदिरे आहेत. तुम्ही कृष्णाच्या एका सुंदर मंदिराला भेट दिली आहे का? सध्या या मंदिराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओतील मंदिराचा परिसर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पुण्यातील कृष्णाचे सुंदर मंदिर

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला मंदिराचा सुंदर परिसर दिसेल. भव्य मंदिर आणि मंदिराच्या परिसरात गायी दिसतील. मंदिरासमोर सुंदर फुलबाग आहे आणि एक छोटा स्वीमींग पूल आहे. त्यामध्ये शेषनागावर नृत्य करतानाची कृष्णाची प्रतिमा दिसत आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असून मंदिराच्या आत कोरीव नक्षीकाम केले आहे. आतून मंदिर खूप सुंदररित्या सजविले आहेत. व्हिडीओमध्ये पुढे तुम्हाला काही लोक मंदिरात भजन गाताना दिसेल. मंदिराच्या आत सुंदर राधा कृष्णाची मूर्ती आहे. मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी दिसत आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ती हे मंदिर नेमके कुठे आहे? तर हे इस्कॉन मंदिर असून पुण्यात कात्रज कोंढवा रोडवर स्थित आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुम्ही या कृष्णाच्या मंदिराला भेट देऊ शकतात.

हेही वाचा : Krishna Janmashtami 2024: चॉकलेटच्या बॉक्सपासून बनवा श्री कृष्णाचा पाळणा; VIDEO तून पाहा सोप्पी सजावट

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : Fixed Dose Combination Drugs : ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधं म्हणजे काय? सरकारने अशा १५६ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय का घेतला?

pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यात कात्रज कोंढवा रोड इथे इस्कॉन मंदिर आहे. सोन्याचा घुमट आणि झुंबर तसेच व्हरांडा असलेले राधाकृष्णाला समर्पित असलेले भव्य मंदिर. पुण्यातील इस्कॉन मंदिरात श्री कृष्ण जन्म महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. जन्माष्टमीचा सण श्री कृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. पण इस्कॉन मंदिरात दहीहंडी साजरी न करता जन्माष्टमीचा १० दिवसाचा महोत्सव साजरा केला जातो. यात धार्मिक कार्यक्रम, पूजा, भजन, कीर्तन आणि प्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. तर काही युजर्सनी ‘राम कृष्ण हरी’ लिहिलेय.

Story img Loader