Pune Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथील ऐतिहासिक वास्तूंबरोबर प्राचीन मंदिरे या शहराची ओळख आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात दर दिवशी हजारो लोक पुणे दर्शनासाठी येतात. ऐतिहासिक वास्तुंबरोबर येथील प्राचीन मंदिरांना सुद्धा भेट देतात.सध्या श्रावण महिना सुरू आहे. अनेक जण पुण्यातील मंदिरांना भेट देतात. आज आपण पुण्यातील अशाच एका आगळ्या वेगळ्या मंदिराविषयी जाणून घेणार आहोत. तु्म्ही कधी पुण्यातील वाघेश्वर मंदिर पाहिले आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर असे वाघेश्वर मंदिर दाखवले आहेत. श्रावण सोमवारला तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. (pune video Mahadev temple Wagheshwar Maharaj Mandir Charholi pune video goes viral on social media)

वाघेश्वर मंदिर

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला वाघेश्वर मंदिराविषयी माहिती सांगितली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला मंदिराचे प्रवेशद्वार दिसेल. त्यानंतर समोर उंचावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य पुतळा दिसेल. त्यानंतर तुम्हाला वाघेश्वर मंदिराचा सुंदर परिसर दिसेल. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि नयन रम्य आहे. मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी शिवजीच्या कलाकृती उभारल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही एकदा मंदिराला भेट द्यावीशी वाटेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर नेमके कुठे आहेत. हे वाघेश्वर मंदिर चऱ्होली बुद्रुक परिसरात आहे.

Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Thane, passenger Thane railway station, train and platform,
VIDEO : रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीत सापडलेल्या प्रवाशाला आरपीएफच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
How To Identify Fake Amul Butter Packets Food shocking Video goes Viral on social media
“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
small kids Viral Video
‘वाघ गुर्रS गुर्रSS करतोय अन् रक्त पितोय…’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्याने गावरान भाषेत सांगितला किस्सा; VIDEO पाहून हसाल पोट धरून

हेही वाचा : केरळमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान खरचं पक्ष्याने तिरंगा फडकवला का? नक्की काय घडले, जाणून घ्या Viral Videoचे सत्य

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांची झाली नदी; प्रवाशांचे हाल, पाहा Viral Video

sachin_jadhav_579 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वाघेश्वर मंदिर चऱ्होली” या व्हिडीओवर काही युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ॐ नमः शिवाय” तर एका युजरने लिहिलेय, “हर हर महादेव”

यापूर्वी सुद्धा पुण्यातील अनेक मंदिराचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कलश मंदिराचा एक व्हिडीओ चर्चेत आला होता. पुण्यापासून फक्त २५ किमीवर असलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि दिसायला आकर्षक आहे. तळेगाव दाभाडे येथे असलेल्या या कलश मंदिराविषयी अनेक लोकांना माहिती नाही.

Story img Loader