Pune Video : पुणे हे सुसंस्कृत, देखणे, ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील इतिहास या शहराची ओळख सांगतो. माहिती तंत्रज्ञानापासून शैक्षणिक क्षेत्रापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये पुणे अव्वल आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, जुन्या इमारती चर्चेत असतात. पुणे दर्शनाला दर दिवशी हजारो लोक येतात. पुण्यात असे अनेक ठिकाणे ज्याविषयी अनेकांना माहिती नाही. तुम्हाला पुण्यातील प्रेम मंदिर माहितीये का? सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या मंदिराचा परिसर दाखवला आहे. हा परिसर इतका सुंदर आहे की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पुण्यातील सुंदर प्रेम मंदिर

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसेल. मंदिराच्या बाहेर शेषनागावर कृष्ण उभा असल्याची एक प्रतिमा दिसेल. त्यानंतर तुम्हाला पुढे या मंदिराच्या परिसरात एक कृत्रित तलाव दिसेल आणि त्यामध्ये मध्येभागी एक सुंदर पाण्याचा कारंजा दिसेल. पुढे व्हिडीओत मंदिरामध्ये काही लोक भजन गीत गाताना दिसेल. व्हिडीओत तुम्हाला एक पुस्तकाचा स्टॉल सुद्धा दिसेल. त्यानंतर पुढे तुम्हाला एका महाराजांची एक मूर्ती दिसेल. मंदिर इतके सुंदर आणि आकर्षक आहे की पाहून कोणीही थक्क होईल. मंदिराच्या आत भिंतीवर रेखीव काम केले आहे. व्हिडीओत तुम्हाला राधा कृष्णाची सुंदर मूर्ती दिसेल. मूर्तीसमोर अनेक भक्त भजन गीत गाताना दिसत आहे. तर काही भक्त मनोभावे दर्शन घेताना दिसत आहे.

हेही वाचा : “हे लोक पुण्याचे नाव खराब करतात” कात्रज चौकात बांधकाम सुरू असलेल्या पुलावर तरुणांचे फोटोशूट, Video Viral पाहून संतापले पुणेकर

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे प्रेममंदिर नेमकं आहे तरी कुठे? तर हे मंदिर कात्रज येथे असून या मंदिराला इस्कॉन मंदिर सुद्धा म्हणतात. राधाकृष्णाचे हे मंदिर प्रेम मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते.

हेही वाचा : Pune Video : सावधान! पीएमटीची ऑनलाईन तिकीट चुकूनही फेकू नका; तिकिटावर दिसतोय तुमचा UPI ID आणि मोबाईल नंबर, व्हायरल होतोय व्हिडीओ

pune_browser या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्याचं प्रेममंदिर” काही युजर्सनी कमेंट्समध्ये ‘जय श्री कृष्णा’ असे लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “इस्कॉन टेम्पल, कात्रज, कोंढवा रोड” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader