Pune Video : पुणे हे विविधतेने नटलेले शहर आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा संबोधले जाते. शिक्षणाचे माहेर घर व ऐतिहासिक शहर म्हणून या शहराची एक वेगळी ओळख आहे. येथील ऐतिहासिक वास्तु, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, पुणेरी पाट्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पुण्यातील रस्ते, खाद्यसंस्कृती एवढंच काय तर पुणेरी माणसं सुद्धा चर्चेचा विषय ठरतात.

तुम्हाला कधी प्रश्न पडला का की ५० वर्षापूर्वीचे पुणे कसे होते? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तब्बल ५४ वर्षांपूर्वीचे पुणे दाखवले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (Viral Video: Pune in the 1970s – A Glimpse of the City 54 Years Ago)

Digital Arrest, Even educated, scam,
शहरबात…. सुक्षिशित असलेले ‘अशिक्षित’
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Territorial Battles Lead to t9 Tiger Deaths in Nagzira Reserve
विश्लेषण : वर्चस्वाची लढाई नागझिऱ्यातील वाघांसाठी धोकादायक?
Interest rate rbi marathi news
रिझर्व्ह बँकेकडून २०२४ मध्ये तरी व्याजदरकपात शक्य नाही : स्टेट बँक
CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
balmaifal ganpati prasad
बालमैफल: प्रसाद… डबल डबल!
whatsapp special campaign focused on small businesses
छोट्या व्यवसायांवर केंद्रित ‘व्हॉट्सॲप’ची विशेष मोहीम
Lalbaugcha raja from 1934 to 2024
लालबागचा राजाच्या १९३४ पासून ते २०२४ पर्यंतच्या सर्व मूर्ती पाहिल्या का? VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : “आता कुठेयत रेल्वे पोलीस अन् टीटी?” व्यक्तीने बांबूने भराभर तोडल्या ट्रेनच्या काचा अन्…; Video पाहून संतापले युजर्स

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला १९७० सालचे पुणे दाखवले आहे. जुने पुणे कसे होते, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल. या व्हिडीओमध्ये पुण्यातील रस्ते, जुन्या इमारती-घरे, दुकाने, वाहने, बाग, बैलगाडी, बसेस , शाळा आणि एवढंच काय तर पुणेरी माणसं सुद्धा दाखवली आहे. पुण्याचा हिरवागार परिसर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. विशेष म्हणजे त्या काळी भरपूर पुणेकरांकडे सायकल होत्या. या व्हिडीओवर लिहिलेय, “१९७० सालचे पुण्यातील रस्ते आणि माणसं. तुम्ही पुण्यात किती साली आलात?”

पाहा व्हायरल व्हिडीओ

welovepune_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि१डीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील रस्ते आणि माणसं पण,५४ वर्षापूर्वीची..”

हेही वाचा : ही कसली आई? रडतंय म्हणून बाळाला आधी मार मार मारलं; मग तोंडात मसाला भरला, VIDEO पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी” तर एका युजरने लिहिलेय, “१९७० मध्ये पुणे इथे घोडागाडी म्हणजे टांगाचे शहर म्हणून बोलले जात होते” आणखी एका युजरने लिहिलेय, “महाराजांच्या काळा पासून इथेच आहोत आम्ही.” एक युजर लिहितो, “व्हिडीओमधुन सर्व काही बदलले असेल, पण सकाळी बेंचवर बसून वर्तमानपत्र वाचणारे काका अजूनही तसेच आहेत” तर एक युजर लिहितो, ” जन्म, माज, गर्व.. सगळं पुण्यातलच आहे आमचं आम्ही नाय आलो कुठून घर दार सोडून”