Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ऐतिहासित वास्तूचे व्हिडीओ तर कधी प्राचीन मंदिराचे व्हिडीओ, कधी पुण्यातील मजेशीर पाट्यांचे व्हिडीओ तर कधी पुणेकरांचे गमतीशीर व्हिडीओ सतत चर्चेत येत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.

असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील लोकांना आगळ्या वेगळ्या डान्स स्टेप्स करताना कैद केले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. (pune video do you see Punekar dancers video viral on social media)

हेही वाचा : IPS Shivdeep Lande Resign: कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील काही लोक दिसतील जे अनोखे डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. त्यांच्या अतरंगी डान्स स्टेप्स पाहून तुम्हालाही हसू येईल. यातील अनेक लोकांचे डान्स व्हिडीओ हे पुण्यातील गणेशोत्सवादरम्यानचे आहे. लहान मुले, वृद्ध महिला पुरुषांपासून तरुण वयोगटातील मुला-मुलींच्या अनोख्या डान्स स्टेप्स तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसतील. या व्हिडीओ वर लिहिलेय, “पुणे आणि पुण्याचे डान्सर नमुने”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO

ek_number_punekar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” पुणे तिथे काय उणे ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपले पुणे आहे. इथे काही पण होऊ शकते.” तर एका युजरने लिहिलेय, “एकशे एक नमुने” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाळ पुढच्या वर्षी कोल्हापूरला ये जरा” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

यापूर्वी पुण्यातील असे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका आजीबाईचा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये  “तुम तो धोखेबाज” गाण्यावर ट्रॅक्टरवर चढून आजीबाईने डान्स केला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आजीवर कौतुकाचा वर्षाव केला होता.