Viral Video : पुणे हे अनेक गोष्टींसाठी लोकप्रिय आहे. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे बघायला लोक आवर्जून येतात. पुण्याची संस्कृती ही जगावेगळी आहे. पुण्याच्या संस्कृतीत भर घालणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या गणेशोत्सवादरम्यान पुण्यात गणेशभक्तांची खूप गर्दी असते. अनेक लोक दुरवरून पुण्यातील गणपती बघायला येतात. पुण्यातील गणपती आणि गणेशोत्सवादरम्यानचे देखावे बघायला सर्व जण खूप उत्सुक असतात. शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळे देखावे दाखवले जातात. प्रत्येक देखावे एकापेक्षा एक सुंदर आणि भारी असतात. सध्या पुण्यातील एका सर्वात सुंदर देखाव्याची चर्चा सुरू आहे. हा देखावा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पेरूगेट पोलीस चौकी येथे असलेल्या छत्रपती राजाराम मित्र मंडळाचा हा भव्य दिव्य देखाव्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला राजाराम मित्र मंडळाचा देखावा दिसत असेल. या मंडळाने यावर्षी पंजाबमधील सुंदर दुर्गियाना मंदिर साकारले आहे. या मंदिराचे मनमोहक दृश्य पाहून तुम्हालाही या मंदिराला भेट द्यावीशी वाटेल. यंदा गणेशोत्सवादरम्यान हा देखावा तुम्ही पाहायला विसरू नका. छत्रपती राजाराम मित्र मंडळ दरवर्षी सुंदर देखावा सादर करत असतात. यंदाच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : “मुंबई कष्टकऱ्यांची, प्रामाणिकपणे राबणाऱ्या हातांची”, आतापर्यंतचं सर्वांत भारी गणपती डेकोरेशन; मुंबईकरांनो Video एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

bikewala_couple या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय पेरूगेट पोलीस चौकी येथे असलेल्या छत्रपती राजाराम मित्र मंडळाजवळ ह्यांचा हा भव्य दिव्य असा देखावा बघायला. तुम्ही पुण्यात गणपती बघायचा विचार करत असाल तर ह्या मंडळाचा देखावा नक्की बघा. एकदम भारी आहे.
पत्ता – छत्रपती राजाराम मित्र मंडळ, पेरूगेट पोलीस चौकी जवळ, सदाशिव पेठ पुणे.

हेही वाचा : मिनी गंगाघाट, मुशक अन् बरंच काही…, मुंबईतील कलाकाराने प्रदूषणावर मांडली वस्तूस्थिती; बाप्पाच्या देखाव्याचा ‘हा’ VIRAL VIDEO एकदा पाहाच

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “राजाराम मंडळाचा देखावा एक नंबर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “दरवर्षी पुण्यात unique आणि छान डेकोरेशन करणारा एकमेव मंडळ” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच मस्त केलय” एक युजर लिहितो, “जबरदस्त, खूप छान आहे. पुण्यात सर्वच भारी असतं” अनेक युजर्सना हा देखावा खूप आवडला असून कमेंट्समध्ये हार्टचे इमोजी शेअर करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video do you see the most beautiful dekhavas or decoration in the pune as panjab durgiyana mandir video viral ndj