Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर आहे. या शहराला प्रचंड मोठा इतिहास लाभला आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक शहर, गडकिल्ले या शहराची ओळख आहे. दरदिवशी हजारो लोक पुणे शहरात येतात आणि पुण्यातील अनेक ठिकाणांना भेट देतात. पुण्यात असे अनेक ठिकाणे आहेत, ज्याविषयी अनेकांना माहिती नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याजवळच्या एका सुंदर ठिकाणाविषयी सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (pune video do you see this beautiful place from 30 km from pune video goes viral on social media)
पुण्यापासून फक्त ३० किमीवर असलेले हे सुंदर ठिकाण पाहिले का? ( do you see this beautiful place from 30 km)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला या ठिकाणचा सुंदर परिसर दिसेल. या ठिकाणी तुम्हाला सुंदर तलाव दिसेल. काही लोक बोटमध्ये मध्ये बसून बोटिंगचा आनंद घेताना दिसत आहे. काही ठिकाणी तुम्हाला रंगबेरंगी तंबु लावलेले दिसतील. काही लोक स्वीमींगचा सुद्धा आनंद घेताना दिसतात. या ठिकाणाहून खूप सुंदर सनसेट दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्याजवळ सर्वात सुंदर ठिकाण, फक्त ३० किमी अंतरावर आहे”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
pune_trending_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा व्हिडीओ आपल्या आवडत्या व्यक्तीला लवकर शेअर करा”
हा व्हिडीओ पानशेत येथील आहे. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले दृश्य तेथील एका फार्मवरील आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हे ठिकाण एवढे आवडले की त्यांनी लोकेशन विचारले आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवर पानशेत हे धरण आहे. पानशेत कॅम्पिंग हा निसर्गाशी संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मित्र आणि कुटुंबासह तुम्ही येथे निसर्गाचा अनुभव घेऊ शकता. अनेक लोक पानशेत कॅम्पिंगला जातात. हे पुण्याजवळील एक लोकप्रिय ठिकाण आहे.