Pune Viral Video : पुणे हे अतिशय लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराची ओळख आहे. पुण्यातील अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. पुणेरी पाट्या, पुणेरी रस्ते, पुणेरी भाषा पीएमटी, खाद्यपदार्थ एवढंच काय तर पुणेरी लोकांचे अनेक मजेशीर व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात पण अनेकदा पुण्यातून असे धक्कादायक व्हिडीओ समोर येतात, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक संतापजनक घटना कैद झाली आहे. पुणे येथील एसबी रोडवरील ही घटना आहे. नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीआ पुण्यातील एसबी रोडवरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक कार एका बसच्या पुढे मुद्दाम गाडी हळू चालवताना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? त्यामागील कारण असे की या बसच्या मागून एक अँब्युलन्सचा आवाज येत होत त्यामुळे बस चालकाने समोरच्या कारला साइड मागण्यासाठी हॉर्न वाजवला पण कारचालक साइड देत नव्हता तेव्हा बसचालकाने कारला ओव्हरटेक केले व अँब्युलन्स ला जागा दिली. पण कार चालकाला ओव्हरटेक केल्यामुळे राग आला. तो रागाच्या भरात पुन्हा बसपुढे आला आणि मुद्दाम कार हळू चालवत होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जीव महत्त्वाचा की अहंकार, असा प्रश्न कोणालाही पडेल सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

https://www.instagram.com/reel/DIWodJPKQy7/?igsh=MTl5OXpzdnJqMXVkMw%3D%3D

shahaanpana.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे दिनांक (12 एप्रिल) (S,B रोड) बस च्या पाठीमागून अँब्युलन्सचा आवाज आल्याने, बसचालक कार वाल्याला MH17AJ4441 हॉर्न देत होता. पण कार वाला जागा देत नव्हता म्हणून बसवाल्याने त्या कार ला ओव्हरटेक केले व अँब्युलन्स ला जागा दिली.. पण कार वाल्याला ओव्हरटेक केल्यामुळे राग आला व पुन्हा पाठीमागून जाऊन बस वाल्याच्या पूढे गाडी एकदम हळू मुद्दाम चालवायला लागला ..”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अहंकार नाही जीव महत्त्वाचा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “बाहेरून येऊन माज करतात” आणखी एका युजरने लिहिलेय,”पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यावर कार चालकावर” अनेक युजर्सनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.