Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर करतात. त्यातले काही जण इतर लोकांना मदत होईल अशी माहिती सुद्धा शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला पोलीस महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाची माहिती सांगताना दिसत आहे.
महिला सुरक्षिततेवरती नेहमी प्रश्नचिन्ह उभे राहतात. अशावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीसांकडून दामिनी पथक सुरू केले आहे. शहरात हे दामिनी पथक महिलांच्या संरक्षणासाठी काम करते. या व्हिडीओमध्ये ही महिला पोलीस याविषयी माहिती सांगताना दिसते.

व्हिडीओत तुम्हाला एक महिला पोलीस दिसेल. ही महिला पोलीस सांगते, “मुलींनो कोणी छेडताहेत, तर आम्ही आहोत दामिनी पथक
शाळेत कॉलेजमध्ये, कॉलेजच्या बाहेरच्या परिसरात किंवा तुमच्या स्वत:च्या घरात तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर आम्ही आहोत दामिनी पथक
वयोवृद्ध व्यक्तींना काही मदत हवी असल्यास आम्ही आहोत दामिनी पथक
वृद्ध महिलांना किंवा लहान मुलींना कोणी त्रास देत असेल तर डायल करा ११२”
या व्हिडीओवर लिहिलेय, “कॉल करा ११२ या क्रमांकावर. पुण्यातील प्रत्येक मुलगी आणि महिलेला हा व्हिडीओ शेअर झालाच पाहिजे”

पाहा व्हायरल व्हिडीओ

welovepunecity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “११२ क्रमांकावर कॉल करा”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान देव तुमचं भलं करो” तर एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्र पोलीस सेवा” आणखी एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्र पोलीसांना सलाम” काही युजर्सनी लिहिलेय, “फोन केल्यावर पोलीस कधीच वेळेवर येत नाहीत” काही युजर्सनी त्यांचे अनुभव सांगितले आहे तर काही युजर्सनी महाराष्ट्र पोलीसांचे कौतुक केले आहे.

Story img Loader