Pune Video : पुण्यात काही ठिकाणी मेट्रो सुरू झाली आहे तर काही ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे त्यामुळे काही ठराविक ठिकाणापर्यंत मेट्रोचा प्रवास पुणेकर करू शकतात पण आता पुणेकर स्वारगेटपर्यंत मेट्रोचा प्रवास करू शकणार आहे कारण पुण्यात स्वारगेट येथील मेट्रो स्टेशन सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबर 2024 म्हणजे आज स्वारगेट मेट्रो स्टेशनचे उद्घाटन होणार होते पण ऐनवेळी त्यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला पण टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला स्वारगेट मेट्रो स्टेशनची पहिली झलक दाखवणार आहोत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वारगेट मेट्रो स्टेशनचा परिसर दाखवला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वारगेट मेट्रो स्टेशनचा भव्य परिसर दिसेल. हा परिसर अतिशय सुंदर व सुरेख दिसत आहे. प्रवाशांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. पुण्यातील इतर मेट्रो स्टेशन पैकी हे एक अतिशय सुरेख असं मेट्रो स्टेशन आहे. लवकरच पुणेकरांना प्रवासासाठी हे मेट्रो स्टेशन सुरू करण्यात येईल.
ही मेट्रो जिल्हा न्यायालय तेच स्वारगेट या मार्गावरून धावणार आहे बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असून ३.६४ किलोमीटरचा प्रवास ही मेट्रो करेन. विशेष म्हणजे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच नदीपात्राखालून ही मेट्रो धावणार आहे.

हेही वाचा : मरीन ड्राइव्ह परिसरात मुस्लीम समुदायाचा भव्य मोर्चा? Viral Video खरा पण त्याचा T20 विजय परडेशी संबंध काय? वाचा सत्य

पाहा व्हायरल व्हिडिओ

pune_is_loveee या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “पुण्यातील स्वारगेट मेट्रोचे आज २६ सप्टेंबर २०२४ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याची पहिली झलक”

हेही वाचा : Mumbai Rains: भांडुपमध्ये जलप्रवाहात माणसाचा गेला तोल अन्…, मुसळधार पावसात पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, पाहा VIDEO

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मस्त! माझा देश बदलत आहे पुढे जात आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “मला आशा आहे की लोक स्वच्छता ठेवेन”
आणखी एका युजरने लिहिलेय, “हे सर्व निवडून येण्यासाठी सुरू आहे पण निवडून कोणी येत नाही” एक युजर विचारतो, “खरच नक्की पूर्ण काम झालंय का?”