Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर असून अनेक गोष्टींसाठी ओळखले जाते. येथील संस्कृती, भाषा, ऐतिहासिक वास्तू इत्यादी या शहराची ओळख आहे. अनेक लोक दरवर्षी पुणे दर्शनासाठी येतात. येथील शनिवारवाडा, लाल महाल, दगडूशेठ गणपती, सारसबाग, सिंहगड इत्यादी ठिकाणांना न चुकता भेट देतात. तुम्ही कधी पुण्यातील सारसबाग पाहिले आहे का? पुण्यातील सारसबाग हे अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. सध्या सारसबागचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारसबागचा सुंदर परिसर दाखवला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (pune video first love of Punekar is Saras Baug video goes viral on social media)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सारसबागचा सुंदर परिसर दिसेल. सारसबागचा संपूर्ण परिसर या व्हिडीओमध्ये दाखवला आहे. सारसबागेतील गणपतीचे मंदिर सुद्धा तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसेल. या व्हिडीओवर मुंबई पुणे मुंबई चित्रपटातील एक डायलॉग ऐकू येत आहे. व्हिडीओवर लिहिलेय, “सारसबाग म्हणजे प्रेम” हा व्हिडीओ पाहून पुणेकरांच्या सारसबागेतील जुन्या आठवणी ताज्या होतील. कॉलेजच्या मित्र मैत्रीणींसाठी ही जागा खूप खास असते. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे कॉलेजचे दिवस आठवतील.

हेही वाचा : मृत्यूचा पाठलाग! आधी दुभाजकाला धडकला, नंतर चार वाहनांना जोरदार धडक; एवढा भयानक अपघात कधीच पाहिला नसेल

पाहा व्हायरल व्हिडीओ

maze.pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकरांचे पहिले प्रेम म्हणजे सारसबाग” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलेय, “अभिमान म्हणजे सारसबाग पहिलं प्रेम” तर एका युजरने लिहिलेय, “आम्ही आपल्या सारसबागमध्ये दर शुक्रवारी साप्ताहिक शिव वंदना चालू केली आहे तर त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. जय शिवराय” तर आणखी एका युजरने लिहिलेय, “सारसबाग म्हणजे प्रेम” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! शत्रू कितीही मोठा असला तरी बुद्धीने करावे काम; कुत्रा अन् सिहांची भयंकर लढाई

पुण्यातील असे अनेक ठिकाणचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी पुणेरी पाट्या चर्चेत येतात तर कधी पुणेकरांच्या गमती जमतीचे व्हिडीओ समोर येतात. पुण्यात अशी अनेक ठिकाणे जे पुण्याची ओळख सांगतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video first love of punekar is saras baug video goes viral on social media ndj
Show comments