Pune Video : सध्या देशात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या मंडळातर्फे सार्वजानिक दुर्गात्सोव साजरा करत देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. नऊ दिवस ठिकठिकाणी दांडिया-गरबा महोत्सवासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अशातच पुण्यात एका ठिकाणी २४ तास अन्नदान केले जात आहे. एका मंडळातर्फे २४ तास मोफत महाप्रसाद दिला जातो. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कोणते मंडळ आहे आणि कुठे आहे? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण या मंडळाविषयी आणि येथील महाप्रसादाविषयी माहिती सांगाताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण सांगतो, “पुण्यात येथे २४ तास महाप्रसाद मिळतो आणि तोही मोफत. होय बरोबर ऐकले तुम्ही पुण्यातले एकमेव मंडळ आहे जे गेल्या बारा वर्षांपासून नवरात्रीचे नऊ दिवस २४ तास अन्नदान करत आहे. दररोज नवीन मेन्यू असतो. उपवासाची खिचडी पण मिळते आणि विशेष म्हणजे स्वच्छता राखली जाते. महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. या मंडळातील कार्यकर्त्यांचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे कारण ते २४ तास लोकांची सेवा करत आहेत. येथील व्यवस्था खूप छान आहे.”
तरुण पुढे सांगतो, “मेडिकल कॅम्प, चष्मे वाटप, महिलांसाठी साडी वाटप असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तर तुम्ही पण महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी लवकर जा आणि अन्न वाया न जाईल याची काळजी घ्या. लोकेशन आहे – दुर्गामाता चौक, के मार्ट समोर, वडगाव शेरी. पुणे ४११०१४”

हेही वाचा : VIDEO: “गर्व कशाचा करता? वेळ बदलायला वेळ लागत नाही” सिंहाची अवस्था पाहून तुमच्याही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Pune Video)

pune_food_diary_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या मंडळाविषयी माहिती सांगितली आहे, “पुण्यात येथे २४ तास महाप्रसाद मिळतो तोही मोफत. नवयुग तरुण मंडळ ट्रस्ट
स्थापना-१९७५
अध्यक्ष – सर्व सभासद
उपाध्यक्ष – सर्व सभासद
कार्याध्यक्ष – सर्व सभासद

विविध उपक्रम –

१. ९ दिवस २४ तास महाप्रसाद
२. ९ दिवस २४ तास उपवासासाठी फराळाची व्यवस्था
३. मोफत नेत्र तपासणी
४. मेडिकल कँप (डायबेटिक)
५. चष्मे वाटप
६. अनाथ/गरजू व्यक्तीसाठी महाप्रसाद पुरविणे.
७. महिला भगिनींसाठी साडी वाटप

हेही वाचा : ‘संकट सांगून येत नाही…’ हत्तीने केला दोन व्यक्तींवर हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे जे घडलं… VIDEO पाहून बसेल शॉक

वैशिष्टे:

  • १२ वर्षांपासून ९दिवस २४ तास अन्नदान सेवा
  • रोज वेगळा मेन्यू आणि नवव्या दिवशी संपूर्ण महाप्रसाद – आइस्क्रीम , गुलाब जमून, पुलाव, पनीर इ.
  • DJ न वापरता ढोल पथक आणि लेझिमने देवीच्या पालखीचे आगमन आणि स्थापना
  • प्लास्टिक प्लेट्स/ग्लास ऐवजी प्लेट्सचा उपयोग केला जातो.
  • २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध
  • ऊन किंवा पाऊसामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून पत्रे वापरून मंडप व टेबल खुर्चीची व्यवस्था

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान उपक्रम” तर एका युजरने लिहिलेय, “तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना माझा सलाम भाऊ” आणखी एका युजरने लिहिलेय, “हेच खरे पुणेकर हीच खरी पुणेरी सेवा. हीच खरी माणुसकी आणि हेच ते नवरात्री उत्सव करणारे खरे कार्यकर्ते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video free mahaprasad is served in pune for 24 hours during navratri festival watch viral video ndj