Dagdusheth Halwai Ganpati Mandir : सध्या गणेशोत्सवाची सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण गणपती बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक आहे. कोणी लाडू मोदक बनवत आहे तर कोणी ढोलताशाची प्रॅक्टिस करत आहे. कोणी गणपतीची मुर्ती साकारत आहे तर कोणी गणपतीचे डेकोरेशन करत आहे. दरवर्षी सोशल मीडियावर गणपतीच्या डेकोरेशनचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. काही डेकोरेशन इतके सुंदर असतात की पाहून कोणीही थक्क होईल.

सध्या पुण्यातील दगडूशेठ गणपती डेकोरेशनचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिर हे आशियातील सर्वात उंच शिवमंदिर आहे

bmc s Divisional Office formed Forest Rights Committee
गोराईमधील आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती, येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी समिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Raigad district administration will implement bamboo cluster scheme planting 35 lakh bamboos
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दिसेल. या व्हिडीओमध्ये काही कारागिर जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारताना दिसत आहे. ते सुंदर डेकोरेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रत्येक कारागिर खूप मेहनतीने छोट्या छोट्या गोष्टींवर काम करताना दिसत आहे. यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे डेकोरेशन आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरत आहे.

हेही वाचा : VIDEO: “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” आजीपुढं नातीसुद्धा फिक्या; नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेत आजीचा भन्नाट डान्स

पाहा व्हायरल व्हिडीओ

hellopune__या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील सर्वात मोठे डेकोरेशन. जटोली शिव मंदिर हे हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात आहे. १९५० मध्ये जटोली येथे आलेल्या श्री स्वामी कृष्णानंद परमहंस महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली होती. मंदिराचे बांधकाम १७७४ मध्ये सुरू झाले. हे भव्य शिवमंदिर जटोलीच्या निसर्गसौंदर्यामध्ये वसलेले आहे.
” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी पाहायला खूप उत्सुक आहे. मी हिमाचल प्रदेशमधून आहे. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.” तर एका युजरने लिहिलेय, ” गणपतीच्या दिवसांमध्ये मी पुण्याला नक्की जाईल.”

हेही वाचा : “सूनबाईचे ३,००० रुपये आले”, ‘लाडकी बहीण’चे पैसे आल्यावर सासू-सुनेने केला जबरदस्त डान्स; VIDEO VIRAL

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण सांगतात, “हिमाचल प्रदेशच्या सोलनमधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे.जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटांवरून पडले आहे.हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्राम स्थान होते,असे मानले जाते.तर जटोली मंदिर विशिष्ट अशा दक्षिण-द्रविड वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि ते सलग तीन पिरॅमिड ने बनलेले आहे. पहिल्या पिरॅमिडवर गणेशाची प्रतिमा तर दुसर्‍या पिरॅमिडवर शेष नागाची प्रतिमा दिसते. हे मंदिर बांधण्यासाठी ३९ वर्षे लागली आहेत.या मंदिराची उंची अंदाजे १११ फूट आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून मंदिराचा आकार १२५ फूट लांब,५० फूट रूंद आणि १११ फूट उंच असणार आहे.”

Story img Loader