Pune Video : सध्या देशात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. ठीक ठिकाणी गणपतीच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. घरोघरी बाप्पााला नैवद्य देण्यासाठी लाडू मोदक तयार केले जात आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अनेक लोक गणपती बघण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. तुम्ही सुद्धा गणपती बघण्यासाठी कुठे जाणार आहात का? जर तुम्ही पुण्यात गणपती बघायला जाताय? मग हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगितली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Do you see Ganpati in pune watch viral video before going outdoor)

या व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यातील गणेशोत्सवाचे दृश्य दाखवले आहे. व्हिडीओमध्ये विविध ठिकाणचे गणपती दाखवले आहे आणि व्हिडीओतून महत्त्वाची माहिती सांगितली आहे.

पुण्यात गणपती बघायला जाताय तर, थोडी ज्ञानात भर.

गणपती बघायसा कधी बाहेर पडायचे?

रात्री, बऱ्यापैकी सर्वच मंडप/देखावे रात्रीच बघण्यास उपलब्ध असतात.

हेही वाचा : Numerology : बाप्पाला आवडतो ‘हा’ मूलांक! तुमची जन्म तारीख सांगेल तुमचा मूलांक गणपतीला आहे का प्रिय?

गणपती बघताना खायचे विशेष पदार्थ?

  • उकडीचे मोदक
  • कंदमुळं
  • खरवस
  • घरगुती पदार्थ

पुण्यातील आवर्जून बघायचे गणपती?

१. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बुधवार पेठ.

२. कसबा गणपती, कसबा पेठ.

३. तांबडी जोगेश्वरी गणपती, बुधवार पेठ.

४. गुरुजी तालीम गणपती, बुधवार पेठ.

५. तुळशीबाग गणपती, बुधवार पेठ.

६. बाबू गेनू गणपती, बुधवार पेठ.

हेही वाचा : VIDEO: आईच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात अन् बापही ओक्साबोक्शी रडतोय; श्रीनगरमध्ये मुलानं जन्मदात्यांबरोबर काय केलं पाहा

७. केसरीवाडा गणपती, नारायण पेठ.

८. नातूबाग गणपती मंडळ, मंडई.

९. जिलब्या मारुती गणपती, शुक्रवार पेठ.

१०. भाऊसाहेब रंगारी गणपती, बुधवार पेठ.

११. शारदा गजानन, मंडई

पाहा व्हायरल व्हिडीओ

life_is_kitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जन्माने पुणेकर आहोत हे बाहेरून आलेल्याना मेसेज करून सांगा” तर एका युजरने लिहिलेय, “जन्माने पुणेकर आहोत हे बाहेरून आलेल्याना मेसेज करून सांगा” आणखी एका युजरने लिहिलेय, “मोबाइल जपून ठेवा.”

पुण्यातील गणपती पाहायला अनेक दुरवरून लोक येतात. पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि भाऊ रंगारी गणपती, दगडूशेठ गणपती, मंडईचा गणपती, बाबूगेनू गणपती असे इतर प्रसिद्ध गणपती हे गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतात.  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती.