Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील ऐतिहासिक वास्तु, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले पाहायला दूर वरून लोक येतात. पुण्याच्या अवतीभोवती सुंदर असा हिरवा निसर्ग दिसून येतो. पुण्याजवळ असे अनेक सुंदर ठिकाणे आहेत, त्या ठिकाणांविषयी कुणालाही माहिती नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यापासून फक्त एक तास अंतरावर असलेल्या एका सुंदर ठिकाणाविषयी सांगितले आहे. हे निसर्गरम्य ठिकाण पाहून तुम्हालाही या ठिकाणी एकदा भेट द्यावीशी वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Pune video : Ghoradeshwar Temple Caves 1 hour from pune city video goes viral)
घोराडेश्वर मंदिर
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला या निसर्गरम्य ठिकाणाचा सुंदर परिसर दाखवला आहे. व्हिडीओत तुम्हाला उंच टेकडीवरील पायवाट दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक गुफा दिसेल आणि गुफेमध्ये सुंदर महादेवाचे मंदिर दिसेल. निसर्गरम्य ठिकाणी उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर पाहून कोणीही थक्क होईल.
व्हिडीओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार, पुण्यापासून फक्त १ तासाच्या अंतरावर असलेले निसर्गाचे स्वर्गस्थान घोराडेश्वर तिसऱ्या आणि चौथ्या शतकातील ही लेणी आपल्याला इतिहासाच्या दुनियेत घेऊन जाते. घोराडेश्वर साहसप्रेमींसाठी ट्रेंकिग आणि हायकिंगची उत्तम संधी आहे. घोराडेश्वर चा बहुतेक भाग जंगलामध्ये व्यापला असून विविध वन्यजीव आणि पक्षी पाहायला मिळतात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
हेही वाचा : एवढी हिम्मत येते कुठून! निवांत झोपलेल्या मगरीला उठवत होता, पाहा पुढे काय घडले?
firsechalpada या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “निसर्गाच्या सौंदर्यात वसलेले भगवान शिवाला समर्पित हे मंदिर पुण्यापासून फक्त दिड तासांच्या अंतरावर एका गुफेच्या आत आहे.
घोराडेश्वर मंदिर, सोमाटणे फाट्याजवळ, पुणे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजच सकाळी दर्शन झालं ” तर एका युजरने लिहिलेय, “घोराडेश्वर आहे नाव आणि तिथे महादेवाच्या २ शिवलिंग आहेत… मुख्य मंदिराच्या पुढे अजून एक मंदिर आहे. हर हर महादेव….. तिथे एक आत्मिक शांती भेटते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “सगळ्यांनी एकदा अवश्य दर्शन घ्या”