Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, किल्ले, येथील खाद्यसंस्कृती, पुणेरी पाट्या इत्यादी गोष्टी नेहमी चर्चेत येतात. सोशल मीडियावर पुण्याच्या अनेक ठिकाणचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एक आगळं वेगळं ठिकाणाविषयी सांगितलेले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा होईल.

पुण्यातील ग्रामसंस्कृती उद्यानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

तुम्ही पुण्यातील ग्रामसंस्कृती उद्यान पाहिले का? होय, ग्रामसंस्कृती उद्यान. या उद्यानात गावाकडच्या गोष्टी दाखवल्या आहेत. या उद्यानात गावातील विविध गोष्टींचे सुंदर चित्रीकरण केले आहे. काही महिला पाणी भरताना दिसत आहे तर काही लहान मुले खेळताना दिसत आहे. काही पुरुष झाडाखाली बसलेले दिसत आहे तर कोणी मंदिरातून देवाचं दर्शन करत आहे, काही लोक भजन किर्तन करताना दिसताहेत तर काही लोक ग्रामसभेत बसलेले दिसत आहे. शिक्षक मुलांना झाडाखाली शिकवत आहे तर एका चित्रात विवाह सोहळा दाखवला आहे, मिठाईचे दुकान, गायी-म्हशी असे अनेक गावाकडील सुंदर किस्से दाखवले आहे.

प्रत्येक चित्र अत्यंत आकर्षक दिसत आहेत. हे सर्व चित्रिकरण पाहून तुम्हालाही गावाकडची आठवण येईल. काही लोकांना त्यांचे गाव आठवेल तर काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल. या व्हिडीओमध्ये गावाकडच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे चित्रिकरण केले आहेत. हे ग्रामसंस्कृती उद्यान पाषाण येथील सोमेश्वरवाडी परिसरात आहे. दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून विश्रांती घेण्यासाठी हा ठिकाणी भेट द्या आणि गावाकडील जीवन अनुभवा. या व्हिडीओवर लिहिलेय, “शहराच्या गर्दीत हरवलेली शांतता पुन्हा इथे सापडेल. ग्रामसंस्कृती उद्यान पाषाण”

हेही वाचा : Viral Video: बहिणीबरोबर शाळेत गेलेला ४ वर्षांचा चिमुकला घरी परतलाच नाही; शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे घडलं ‘असं’ काही…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: ‘ती’ एक चूक तरुणाच्या जीवावर बेतली; झोका घेताना थेट कोसळला…पर्यटनस्थळातील थरारक व्हिडीओ आला समोर

iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चला आजीच्या गोष्टीतलं हरवलेलं गाव पहायला..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान जुन्या आठवणीला उजाळा मिळेल यामुळे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर आहे. आम्ही जाऊन आलोय.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.