Viral Video : पुण्यात कधी काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. कधी पुणेरी पाट्या, तर कधी पु्ण्यातील पीएमटी बसमधील व्हिडीओ व्हायरल होतात. अनेकदा पुण्यातील ऑटोरिक्षाचालकांचे सुद्धा व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आकर्षक ऑटोरिक्षा दिसेल. ही फॅन्सी आणि हटके ऑटो रिक्षा पाहून कोणीही थक्क होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक हटके ऑटो रिक्षा दिसेल. जी समोरून ऑटो रिक्षा सारखी तर मागून रथासारखी आहे. ही ऑटो रिक्षा पाहून कोणीही थक्क होईल. या ऑटो रिक्षाची आतील आणि बाहेरील डिझाइन अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. कोणाचीही नजर हटणार नाही, अशी ही ऑटो रिक्षा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
व्हिडीओ पाहून तु्म्हाला प्रश्न पडला असेल की ही खरंच पु्ण्यातील ऑटो रिक्षा आहे का? तर हो, ही ऑटो रिक्षा पुण्यातील असून पुण्यातच बनवली आहे. पुण्यात कुंभार वाड्याजवळ तुम्हाला ही ऑटो रिक्षा दिसेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
siddhusgarage या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही कधी पुण्यात अशी फॅन्सी ऑटो रिक्षा पाहिली का? ही मेड इन पुणे आहे. जर तुम्हाला या ऑटो रिक्षातून प्रवास करायचा असेल तर आम्हाला कळवा”
हेही वाचा : अल्लू अर्जुनने सांगितले आहारासह फिट राहण्याचे रहस्य, “रोज सकाळी रिकाम्या पोटी….”; तज्ज्ञांचे मत काय?
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “आमची पण खूप इच्छा आहे भावा अशी ऑटो बनवायची,आणि बनवू सुद्धा पण ट्रॅफिक आणि आरटीओ वाले फाईन वर फाईन मारत राहतील,म्हणून नाही करत. मुंबई मध्ये जरा पण मॉडीफाईड गाडी नाही चालू देत. बाकी एक नंबर आहे गाडी.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आयुष्यात पाहिली रिक्षा आहे जी मला आवडली” एक युजर लिहितो, “ही सुंदर आहे पण सुरक्षित नाही” तर एक युजर लिहितो, “पावसाळ्यात कसं चालवणार?” अनेक युजर्सना ही फॅन्सी ऑटो रिक्षा आवडली असून त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.