Pune Viral Video : सध्या पावसाळा सुरू आहे. सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील व्हिडीओ युजर्सचे लक्ष वेधून घेताहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.हा व्हिडीओ पुण्यातील आहे. व्हिडीओमधील रस्त्याची वाईट अवस्था पाहून तुम्हीही चकीत व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचलेले दिसत आहे. पाणी साचलेल्या अशा रस्त्यांवरून अनेकदा वाहनांचा अपघातही होऊ शकतो. (pune video heavy rain exposed potholes filling with rainwater on the hinjewadi wakad service road)

हिंजवडी वाकड सर्व्हिस रोडवरील व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हिंजवडी वाकड सर्व्हिस रोड दिसेल. रस्त्यावर खूप सारे खड्डे दिसत असतील आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले दिसत आहे.या रस्त्यावर वाहनांची रेलचेल सुरू आहे. पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून वाहने जाताना दिसताहेत. पुण्यासारख्या मोठ्या शहरात रस्त्यांची ही अवस्था पाहून कोणीही अवाक् होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “हिंजवडी – वाकड सर्व्हिस रोड अवस्था” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Pune shocking video A bike rider fell into a drainage in Pune's Narhe area
पुण्यात हे काय चाललंय? बाईकवरून जाताना तोल गेला; तरुण गाडीसह ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला, पुण्याचा थरारक Video
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब
Cheating on petrol pumps bike are filled with water in mumbai kurla petrol pump video
VIDEO: धक्कादायक! मुंबईतील ‘या’ पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या नावाखाली चक्क पाणी भरत होते; बाईक चालकानं कसं शोधून काढलं पाहा

हेही वाचा : नक्की आई कोण तेच समजेना? माय-लेकीचा तमिळ गाण्यावर जबदरस्त डान्स पाहून नेटकरी गोंधळात; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

पाहा व्हायरल व्हिडीओ

pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इनकम टॅक्स भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४. तुमच्या भागातल्या रोडची अवस्था कशी आहे..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही दररोज याचा सामना करतो. ६ महिन्यांत ३ ते ५ वेळा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली पण भ्रष्टाचारामुळे पुन्हा खड्डे पडले” तर एका युजरने लिहिलेय, “माझी रिक्षा पलटी झाली असती या ठिकाणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “पीसीएमसीने पाण्याची योग्य विल्हेवाट करण्यासाठी योजना आखली पाहिजे”

हेही वाचा : Video: २२ वर्षीय तरुणाची महिन्याची कमाई ऐकून अशनीर ग्रोवर यांना धक्काच बसला; म्हणाले, “तू आमच्या जागी बसायला हवं”

हिंजवडी वाकड चिंचवड शहरातील आयटी हब व उच्चभ्रू परिसर ओळखला जातो. आयटी कंपन्यांमुळे या रस्त्यांवर वाहनांची रेलचेल सुरू असते. अशात अशा रस्त्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Story img Loader