Pune In One Word : पुणे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराची ओळख सांगतो. या शहरातील ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, उत्तम शिक्षण, तसेच येथील संस्कृती आजही टिकून आहे. शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, ऐतिहासिक शहर, आयटी हब इत्यादी अनेक नावांनी पुणे शहर हे ओळखले जाते.

दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी आणि तरुण मंडळी नोकरीसाठी पुणे शहरात येतात. काही लोकांना पुणे हे शहर एवढं आवडतं की ते कायमचं तेथेच स्थायिक होतात. सोशल मीडियावर पुण्याविषयी प्रेम व्यक्त करणारे किंवा पुण्यातील अनेक गमती जमतीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही कधी पुण्याचे एका शब्दात वर्णन करू शकता का? (pune video how can we describe pune in one word netizens answer amazed you)

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

हेही वाचा :कुत्र्याला स्वच्छतेचे महत्त्व कळले, माणसाला कधी कळणार? नदीतून कचरा बाहेर काढून कचरापेटीत टाकला, VIDEO एकदा पाहाच

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील विविध ठिकाण आणि या शहराची ओळख सांगणाऱ्या अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. तसेच पुण्याचे एका शब्दात वर्णन करण्यास सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला पुण्यातील मेट्रो स्टेशनचे दृश्य दिसेल. त्यानंतर दगडूशेठ मंदिराचे दृश्य दिसेल. त्यानंतर सूर्यास्ताचे सुंदर दृश्य दिसेल. पुढे पुण्यातील रस्ते दाखवले आहे. त्यानंतर ढोल ताशाचा गजर दिसतोय. त्यानंतर पुढे व्हिडीओत तुम्हाला शनिवारवाडा दिसेल. हे सर्व दृश्य पाहून तुम्हाला संपूर्ण पुणे दर्शन घडल्यासारखे होईल.

हेही वाचा :असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : आयुष्याचा असा खेळ करू नका! सिलेंडरवर बसून चालत्या बाईकवर आजोबा करतायत स्टंट, VIDEO पाहून बसेल धक्का

puneshorofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, पुण्याला एका शब्दात कसे वर्णन कराल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आनंददायी भावना…!” तर एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा….” आणखी एका युजरने लिहिलेय, “स्वर्ग” एक युजर लिहितो, “पुणे एवढं बोललो तरी समजून जातात अख्या जगातील लोक” तर एक युजर लिहितो, “जशास तसं म्हणजे पुणे….” आणखी एक युजर लिहितो, “पुणे म्हणजे घर”

Story img Loader