Pune Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्याला खूप मोठा इतिहास लाभला आहे. पुण्याची भाषा, संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे या शहराची ओळख सांगतात. आजही पुणे शहर आपला ऐतिहासिक वारसा जपताना दिसते. शहरात अनेक ठिकाणी जुन्या वास्तू आहे ज्या आपल्याला पुण्याचा इतिहास सांगतात तर काही इमारतीमध्ये कालांतराने बदल होत गेला.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याच्या रेल्वे स्टेशनचे जुने फोटो दाखवले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पुणे रेल्वे स्टेशनला पुणे जंक्शन सुद्धा म्हणतात. हे स्थानक पुणे शहराला सर्व प्रमुख शहरांशी जोडते पुण्याहून अनेक रेल्वे गाड्या धावतात. दरदिवशी हजारोच्या वर लोक पुणे रेल्वे स्टेशनवरून शहरात ये जा करतात. तुम्ही कधी पुण्यात आला असेल किंवा पुण्यात राहत असाल तर पुणे रेल्वे स्टेशन तुम्ही पाहिले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का जुने रेल्वे स्टेशन कसे दिसायचे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये पुणे रेल्वे स्टेशनचे जुने दोन फोटो दाखवले आहे. पहिला फोटो हा १९०० मधील आहे. त्यानंतर दुसरा फोटो हा १९८० म्हणजे तब्बल ८० वर्षानंतरचा आहे. १९०० आणि १९८० या दोन्ही वर्षातील पुणे रेल्वे स्टेशनमध्ये थोडा फार बदल दिसून येतो. त्यानंतर व्हिडीओमध्ये आताच्या पुणे रेल्वे स्टेशनचा फोटो दाखवला आहे. आताच्या स्टेशनमध्ये बराच बदल झालेला दिसून येतो.
पाहा व्हायरल व्हिडीओ
welovepune_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे स्टेशनचे रुपांतर”
पुणे रेल्वे स्टेशनचा आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : ‘जेव्हा लहान मुलांकडे मोबाइल नसायचा…’ चिमुकल्यांचा खोडकरपणा पाहून आठवतील तुमच्या बालपणीचे दिवस; पाहा VIDEO
यापूर्वी पुण्यातील असे अनेक ठिकाणचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये पुणे शहरातील काही दुर्मिळ जुनी छायाचित्रे दाखवली होती. तसेच एका व्हिडीओमध्ये १९च्या काळात स्वारगेटचा परिसर कसा दिसायचा, हे दाखवले होते तर एका पोस्टमध्ये पुण्याच्या खजिना विहीरीचा जुना फोटो शेअर केला होता.