Viral Video : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याची विशेष ओळख आहे. येथील ऐतिहासिक वास्तु, मंदिरे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवून आणतात. पुण्यात असे अनेक ठिकाणे आहेत, जे खूप लोकप्रिय आहेत पण काही ठिकाणे असे आहेत जे लोकांना अजूनही माहीत नाही. तुम्ही कधी कलश मंदिराविषयी ऐकले आहे का? हे मंदिर अगदी पुण्याजवळ आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कलश मंदिराविषयी सांगितले आहे. (pune video kalash temple is Just 25Km from Pune Beautiful and peaceful temple)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्हाला सुंदर कलश मंदिर दिसेल. या मंदिराचा आकार कलश प्रमाणे आहे. हे मंदिर अतिशय आकर्षक व सुंदर दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला मंदिराचा भव्य द्वार दिसेल. मंदिराच्या आत सुंदर अशी श्री शंखेश्वर पार्श्वनाथ भगवानची मूर्ती आहे. हे जैन धर्माचे मंदिर असून या मंदिराची रचना अतिशय सुरेख आहे. हे मंदिर पुण्यापासून फक्त २५ किमी दूर असून तळेगाव दाभाडे जवळ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या मंदिराला एकदा भेट द्यावी, असे वाटेल.

हेही वाचा : थरारक! वाऱ्याच्या वेगाने धावून दोन सिंहांचा श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे असं काही घडलं…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हायरल व्हिडीओ

happie_hiker07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यापासून २५ किमी अंतरावर, सुंदर आणि शांत मंदिर; कलश मंदिर, बिरला गणपती मंदिरासमोर, तळेगाव दाभाडे”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर जैन मंदिर आहे” तर एका युजरने लिहिलेय, ” तळेगाव दाभाडेजवळ हे कलश मंदिर आहे, खूप सुंदर आहे.” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला आहे.

हेही वाचा : Rakshabandhan Leave : रक्षाबंधनाची सुट्टी मागितल्याने काढलं कामावरून, व्हॉट्सॲप चॅट व्हायरल झाल्यानंतर कंपनीनेही दिलं स्पष्टीकरण; म्हणाले “मुलीचा गृहपाठ…”

यापूर्वी पुण्यातील असे अनेक सुंदर मंदिरांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरातील रहाटणी येथे शिवराज नगर, काळेवाडी फाट्याजवळ असलेल्या सुंदर विष्णू मंदिराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्या मंदिराला विष्णू धाम सुद्धा म्हणतात. रात्रीच्या अंधारात सोनेरी रंगाने हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. शनिवारी रविवारी या मंदिरात पुणेकरांची खूप गर्दी असते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video kalash temple is just 25km from pune beautiful and peaceful temple near talegaon dhabade video goes viral ndj