Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील संस्कृती, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू हे या शहराची ओळख आहेत. पुण्यात असे ठिकाणे आहेत, जे बघण्यासाठी हजारो लोक पुण्यात येतात. पुण्यातील लाल महाल, सारसबाग, खडकवासला, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती मंदिर इत्यादी ठिकाणाला भेट देतात पण पुण्यात आणि पुण्याजवळ असे काही ठिकाणे आहेत, जे अजुनही काही लोकांना माहिती नाही. (pune video Kedareshwar Temple and 380 years old ghumatachi vihir near Talegaon Dabhade video goes viral)
सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याजवळच्या एका खास ठिकाणाविषयी सांगितले आहे. तुम्ही पुण्याजवळील केदारेश्वर मंदिर पाहिले आहे का? जर नाही तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
केदारेश्वर मंदिर अन् ३८० वर्ष जुनी प्राचीन विहीर
या व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्याजवळ असलेल्या केदारेश्वर मंदिराविषयी सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण या मंदिराविषयी माहिती सांगतो, “पुण्यापासून अगदी ३० किमी अंतरावर असलेले ३८० वर्ष जुने प्राचीन घुमटांची विहिर आहे. या विहिरीमध्ये प्राचीन शिवमंदिर सुद्धा आहे. खरंच अद्भूत अशी जागा आणि जवळच असलेले केदारेश्वर महादेवाचे मंदिर खूप मस्त असून तुम्हीसुद्धा नक्की बघा आणि अशा जागांविषयी तुम्हालाही माहिती असेल तर कसअसलेले हे मंदिर तळेगाव दाभाडे येथे आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या मंदिराला एकदा भेट द्यावीशी वाटेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
happie_hiker07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त एका तासाच्या अंतरावर पुण्यापासून ३० किमीवर केदारेश्वर मंदिर, तळेगांव धाबाडे खूप सुंदर आणि शांतीमय जागा
वेळ – सकाळी ८ ते १२.३० आणि सायंकाळी ४ ते ७.३०” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान जागा आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “सुंदर मंदिर आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे मंदिर सर्वांनी एकदा तरी पाहावे.”