Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती, प्राचीन वास्तू आणि मंदिरे, ऐतिहासिक इमारती या शहराची ओळख सांगतात. पुणेरी लोक, पुणेरी भाषा, पुणेरी पाट्या एवढंच काय तर पुण्यातील अनेक गोष्टी लोकप्रिय आहे.

पुण्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पीएमटी बस सुद्धा नेहमी चर्चेचा विषय ठरते. दरदिवशी पुण्यात हजारो लोक पीएमटीने प्रवास करतात. पीएमटीमधील गमती जमती, भांडणं, मजेशीर किंवा कधी कधी थक्क करणाऱ्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात.

central minister nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर माफी, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mumbai Metro Jobs 2024: mmrcl job mumbai metro vacancy 2024 eligibility salary details
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Mumbai Boat Accident Video
Mumbai Boat Accident Video : ‘नीलकमल’ बोटीला नौदलाची स्पीडबोट धडकली तो क्षण कॅमेऱ्यात कैद; भीषण दुर्घटनेचा Video व्हायरल
Shocking video Shark attacks crocodile carcass australia terrifying scene video goes viral on social
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
sixth floor of mantralaya likely to close for visitors
मंत्रालयातील सहावा मजला अभ्यागतांसाठी बंद?
Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पीएमटी बसमध्ये ऑनलाइन तिकीट काढणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची माहिती सांगितली आहे. तुम्ही ऑनलाईन तिकिट काढता का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Pune Video never throw pmt bus online ticket video viral showing upi id and mobile number seems on the ticket)

हेही वाचा : “लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पीएमटीचे एक ऑनलाईन तिकिट दाखवले आहे. वडगाव बु. ते एसएनडिटी कॉलेज पर्यंतचे तिकिट आहे. प्रवासीने १५ रुपयांचे ऑनलाईन तिकिट काढले आहे. पण तुम्हाला माहितीये का जेव्हा आपण पीएमटीचे ऑनलाईन तिकिट काढतो तेव्हा तिकिटावर तुमचा युपीआय आयडी दिसतो. या व्हिडीओमध्ये तुम्हाला तिकिटावर युपीआय आयडी दिसते. हे तिकिट जर तुम्ही फेकले तर कोणीही तुमच्या युपीआय आयडीचा चुकीचा वापर करून तुमची आर्थिक फसवणूक करू शकतात.
या व्हिडीओवर लिहिलेय, “सावधान.. सावधान पीएमपीएमएल चे ऑनलाईन तिकिट काढत असाल तर सावधान. ऑनलाईन तिकिट काढल्यामुळे तुमचा युपीआय आयडी प्रिंट होत आहे आणि युपीआयआडीमध्ये तुमचा मोबाईल नंबर सुद्धा दिसत आहे. त्यामुळे आपले तिकिट कुठेही फेकू नका.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “काकूंना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले” ठाण्यात महिलांनी साडीमध्ये वाजवला रॉक बँड; VIDEO पाहून नेटकरीही थक्क

pune_browser या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहचवा…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अगदी महत्वाची माहिती” तर एका युजरने लिहिलेय, “बरं झालं माहिती दिली” आणखी एका युजरने लिहिलेय, “त्या पेक्षा डिजिटल तिकिट काढा अॅप वरून”

Story img Loader