Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ इतके धक्कादायक असतात की पाहून अंगावर काटा येतो. अनेक जण त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या घटनांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पुण्यातील आहे. व्हिडीओत तुम्हाला एक महिला मद्यधुंद अवस्थेत भर चौकात राडा करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (pune Video of a drunken woman shouted loudly on a road in pune video goes viral)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात मद्यधुंद महिलेनी केला भर चौकात राडा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल जिने मद्यपान केलेले आहेत आणि रस्त्यावर बसून आरडाओरडा करताना दिसत आहे. तिला पाहून काही लोक जमलेले दिसत आहे तर काही लोक व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहे.हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील वानवडी येथील जगताप चौकातील आहे. एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत शनिवारी मध्यरात्री धिंगाणा घातल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आलेली आहे.

मद्य प्राशन करत महिलेने असभ्यवर्तन केल्याचे सांगत प्रत्यक्षदर्शीकडून पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत होती. यामुळे रस्त्यावर गर्दी जमल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

काही दिवसांपूर्वी नाशिकमधून असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मद्यधुंद तरुणीला पोलिसांनी अडवल्यानंतर तिने भररस्त्यात राडा केला होता. पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. या मद्यधुंद तरुणीला पोलि‍सांनी अडवल्यानंतर त्यांच्याशी वाद घालताना दिसली होती. यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ समोर आलेले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video of a drunken woman shouted loudly on a road in pune video goes viral ndj