Pune Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पु्ण्यातील सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात एक सफाई कामगार महिला मनसोक्त नाचताना दिसत आहे. या महिलेला नाचताना पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांच्या चेहऱ्यावर या महिलेला पाहून स्मित हास्य येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ वाघोली येथील गेनमाळ जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गोंधळाचा कार्यक्रम सुरू आहे. अनेक भक्त लोक गोंधळ बघताना दिसत आहे. देवीची गाणी ऐकताना दिसत आहे. या व्हिडीओत एक महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान केटरर्समध्ये साफ सफाईचे काम करीत असताना ही महिला देवीच्या गाण्यावर आनंदाने ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला देवाविषयी या महिलेची श्रद्धा दिसून येईल. या महिलेच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावातून तिच्या मनातील आनंद दिसून आला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वाघोली परिसरातील गेनमाळ जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातील आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

wagholitimes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वाघोली येथील गेनमाळ जागरण गोंधळाच्या कार्यक्रम मध्ये केटरर्स मधील साफ सफाईचे काम करीत असताना एका महिलेने देवीच्या गाण्यावर आनंदाने ठेका धरला. देवा प्रती असणारी महिलेची श्रद्धा आनंदाने आपोआप व्यक्त झाली. वेळ काळ महत्त्वाची नसते फक्त देवावरील श्रद्धा महत्वाची असते याची जाणीव व्हिडिओ पाहून येते.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गरिबांचा आनंद व्यक्त असाच केला जातो” तर एका युजरने लिहिलेय, “यालाच तर आनंद म्हणतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “कोणत्या ही परिस्थिती मध्ये स्वतःला आनंदी कसं ठेवायचं त्याच उदाहरण म्हणजे ह्या मावशी” एक युजर लिहितो, “खूप लोक आहेत आनंद व्यक्त करू शकत नाहीत.काही परिस्थितीमुळे फक्त दिवस ढकलत असतात. त्या ताईने पण तेच केलं की कोणी पाहत नाही याची काळजी घेत एकटी एका साइडला तिचा आनंद व्यक्त केला” तर एक युजर लिहितो, “आनंद व्यक्त करून शेवटी देवीस नमस्कार केला” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.