Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराची ओळख आहे. येथील प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, ऐतिहासिक ठिकाणे या शहराचा इतिहास सांगतात. पुण्यात असे अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाणे आहेत, जे बघायला लोक दुरवरून येतात. पण काही ठिकाणे असे असतात ज्याविषयी अनेकांना माहिती नसते.

सोशल मीडियावर अशा अनेक ठिकाणांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आपल्याला त्या ठिकाणी भेट द्यावीशी वाटते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील अशाच एका सुंदर मंदिराविषयी सांगितले आहे. या मंदिराचा व्हिडीओ पाहून तुम्हीही येथे भेट देण्याचा मोह आवरू शकणार नाही.

पुण्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेले पुरातन शिवालय पाहिले का?

हा व्हायरल व्हिडीओ एका सुंदर मंदिराचा आहे. मंदिराचा उंच कळस आणि मंदिराच पांढरा शुभ्र रंग आपल्याला मंदिराकडे आकर्षित करतो. हा व्हिडीओ अतिशय उंचावरून शूट केला आहे ज्यामुळे तो अधिक विलोभनीय वाटतोय. पायऱ्या, प्रवेश द्वार, सुंदर रचना, उंच कळस व अवती भोवती असलेले डोंगर झाडी या मंदिराच्या सौंदर्येत आणखी भर टाकते. या मंदिरावर नम: शिवाय असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर नेमके कुठे आहे? आणि या मंदिराचे नाव काय आहे? तर या मंदिराचे नाव त्र्यंबकेश्वर मंदिर असून वेताळ टेकडी च्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे गोखले नगर येथील पुरातन शिवालय आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर पाहून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Pune Viral Video)

pahadi_vaibs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील सुंदर मंदिर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मित्रमैत्रिणींबरोबरच्या माझ्या खूप सुंदर आठवणी आहे या मंदिरात. मला खूप छान वाटले तुम्ही येथील सौंदर्य कॅमेऱ्यात कैद केले” तर एका युजरने लिहिलेय, “हर हर महादेव” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader