Viral Video : पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचा इतिहास, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू या शहराची ओळख सांगतात. पुण्यात तसेच पुण्याजवळ असे अनेक ठिकाणे आहे ज्यविषयी लोकांना महिती नाही. सध्या महाशिवरात्री निमित्त अनेक महादेवाचे किंवा शिव मंदिराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये पुण्यापासून 20 किमी अंतरावर असलेल्या एका सुंदर मंदिराविषयी सांगितले आहे. (Pune video of chaturmukh shiv mandir 20 km away from pune city must watch on maha shivratri video goes viral)
पुण्यापासून फक्त २० किमी अंतरावर असलेलं हे सुंदर शिवमंदिर पाहिले का?
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सुंदर शिव मंदिर दिसेल. या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहे. मंदिराच्या परिसरात शिरताच तुम्हाला नंदीची मूर्ती दिसेल. नगासह त्रिशूळ डमरूची प्रतिमा साकारलेली दिसेल. मोठ्या अक्षरात ओम साकारलेला दिसेल. मंदिराच्या आत शिरताच काळ्या दगडात कोरलेली शिवलिंग दिसेल. या शिवलिंगाचे दृश्य पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर नेमकं आहे तरी कुठे? आणि या शिव मंदिराचे नाव काय आहे? तर हे या मंदिराचे नाव चतूर्मुख शिव मंदिर असून हे मंदिर बोपदेव घाटाच्या पुढे आहे. विशेष म्हणजे हे मंदिर पुण्यापासून फक्त २० किमीवर आहे. महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही या मंदिराला अवश्य भेट देऊ शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral video)
happie_hiker07 याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यापासून 20KM बोपदेव घाटाच्या पुढे उजव्या बाजूला आतमध्ये असलेले प्राचीन चतूर्मुख शिव मंदिर, निसर्गाच्या सानिध्यात हे एक मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात हे मंदिर आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हर हर महादेव” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर ठिकाण आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या ठिकाणी आवर्जून भेट द्या” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.