Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील संस्कृती, इतिहास, ऐतिहासिक वास्तू आणि प्राचीन मंदिरे या शहराची ओळख सांगतात. दर दिवशी हजारो लोक पुणे दर्शनाला येतात. पुणे हे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यामुळे पुण्याला एक वेगळे आणि आकर्षक हवामान लाभले आहे. या शहराचे हवामान या शहाराची शोभा वाढवतात.
सध्या हिवाळा सुरू झाला आहे. पुण्यातील हिवाळा अत्यंत आल्हाददायक असतो. दिवसाचे तापमान जवळपास २५ अंश सेल्सियस असते आणि रात्रीचे तापमान १० ते १५ अंश सेल्सियस असते. शहरात सर्वत्र धुके पसरलेले दिसून येते. त्यामुळे हिवाळ्यात या शहराची एक वेगळीच सुंदरता दिसून येते.
सोशल मीडियावर सध्या पुण्यातील हिवाळा कसा असतो, हे दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील काही दृश्ये दाखवले आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Pune Video of you ever experiencing winter in pune video goes viral)
पुण्यातील हिवाळा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुणे शहराच्या विविध भागातील दृश्ये दिसेल. पुण्यातील रस्ते, नदी, नाले, फुथपाथवरील दुकाने, धुके, आणि येथील हिरवागार परिसर दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओ पाहून तुम्हाला जाणवेल की हिवाळ्यात पुण्याच्या सौंदर्यात आणखी भर पडते. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यातील हिवाळा”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
beingpunekarofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे हिवाळा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुणे म्हणजे प्रेम आहे” तर एका युजरने लिहिलेय, “सुंदर” आणखी एका युजरने लिहिलेय, “पुण्याची सुंदरता” काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.