Viral Video : नुकताच व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा करण्यात आला. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीजवळ प्रेम व्यक्त करतात. सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. सध्या असाच एक पुण्यातील वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे जोडपे निवांत बसलेले दिसत आहे. त्यांच्या नात्यातील प्रेम पाहून तुम्हीही भारावून जाल.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं, हे वाक्य तु्म्ही अनेकदा ऐकले असेल. खरं तर दिवसेंदिवस प्रेमाची व्याख्या बदलत आहे. पूर्वीच्या लोकांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती आताच्या तरुण मंडळीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. या व्हायरल व्हिडीओतील या जोडप्यांचे प्रेम पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा

हेही वाचा : पुण्यातील एका नवविवाहित जोडप्याने नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, VIDEO व्हायरल

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील मनपा जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज पूलावरील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसते की एक वृद्ध जोडपे कट्ट्यावर बसले आहे. ते निवांत बसलेले असून गप्पा मारताना दिसत आहे. या जोडप्याच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर ‘क्या यही प्यार है’ हे सुंदर लोकप्रिय गीत लावले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल. खरं प्रेम हे नेहमी आपल्या बरोबर असतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याबरोबर सावलीप्रमाणे असतं. या व्हिडीओतून तुम्हाला दिसेल की वयानुसार आणखी प्रेम वाढत जातं.

rohanpawar.1812 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “क्या यही प्यार है” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “निरागस हास्य जगण्याचा अर्थ सांगून जाते” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम व निरागस” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला माझ्या आई बाबाची आठवण आली पाहून… किती निरागस प्रेम आहे”

Story img Loader