Oldest Misal in Pune : तुम्ही मिसळप्रेमी आहात का? जर हो, तर तुम्ही पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ किंवा कोल्हापुरी मिसळ यापैकी एक तरी मिसळचा आनंद घेतला असेल. खरं तर प्रत्येकाची आवडती मिसळ ही वेगवेगळी असू शकते. काही मिसळमध्ये उसळ असते तर काही मिसळमध्ये फरसाण असतात, काही मिसळमध्ये पावच्या जागी ब्रेड असतात पण प्रत्येक शहरातील मिसळची चव ही वेगवेगळी असते. आज आपण एका अस्सल पुणेरी मिसळ विषयी जाणून घेणार आहोत. पुण्यातील सर्वात जुनी मिसळ म्हणून ओळखली जाणारी वैद्य मिसळ तुम्ही कधी खाल्ली का?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील या वैद्य मिसळविषयी सांगितले आहे. ही मिसळ ११३ वर्ष जुनी आहे म्हणजे गेल्या ११३ वर्षापासून ही मिसळ पुणेकरांचे हक्काचे ठिकाण आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका जुन्या इमारतीमध्ये वैद्य उपहार गृह दिसेल. एक आजोबा हे उपहार गृह चालवतात. या उपहारगृहात लोकांची खूप गर्दी असते. येथे मिसळ पाव, पातळ भाजी, पाव पातळ भाजी, कांदा पोहे, शेव चिवडा सुका, बटाटा भजी, शेव पातळ भाजी, शेव प्लेट, डिंक लाडू, शेंगदाणा लाडू, दही ताक इत्यादी पदार्थ मिळतात तरीसुद्धा लोक येथे खास करून मिसळ खायला येतात. या व्हिडीओमध्ये तुम्हाला लोकांची भरपूर गर्दी दिसेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यातील ११३ वर्षांपासूनची सर्वात जुनी मिसळ “
हेही वाचा : पर्यटकांनी चक्क सिंहाचे केस ओढले; जंगलाचा राजा संतापला अन् दाखवला असा इंगा की…VIDEO पाहून थरकाप उडेल
पाहा व्हायरल व्हिडीओ
kothrudkarpune and pcmc_kar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या उपहारगृहाचा पत्ता सांगितला आहे, “वैद्य उपहारगृह बागडे रोड, बुधवार पेठ, पुणे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या मिसळसाठी मी नवी मुंबईवरून पुण्याला आलो होतो. ही जागा अत्यंत जुनी आहे आणि मिसळची चव अप्रतिम आहे. जर तुम्ही मिसळ प्रेमी असाल तर नक्की भेट द्या.” तर एका युजरने लिहिलेय, “मी लहानपणापासून येथे येतो. खूप छान आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “यांची मिसळ खूप छान आहे. म्हणून ११३ वर्षांपासून इथे आहे” अनेक युजर्सनी या मिसळविषयी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.