Pune Rain Viral Video : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात जोरदार पाऊस पडला होता. जन जीवन विस्कळीत झाले होते. नदी, नाले, तलाव ओसंडून वाहत होते. रस्त्यावर नदीसारखे पाणी साचले होते. लोकांच्या घरात पाणी शिरले होते. पुण्याची परिस्थिती अत्यंत बिकट होती. पुरानंतर पुण्यातील काही घरांची अवस्था पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. अनेक लोकांच्या घरातील वस्तुंचे नुकसान झाले.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पुरानंतर पुण्यातील सिंहगड रोडवरील घरांची अवस्था दाखवली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Pune Video Viral after Flood)

हेही वाचा : Wayanad landslides: भूस्खलनाच्या सहा महिन्यांपूर्वी किती सुंदर दिसत होते वायनाड, मुंडक्काईचे निसर्ग दर्शविणारा Video Viral

पुरानंतर पुण्यातील घरांची अवस्था

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील घरे दाखवली आहेत. पुरानंतर काही लोकांच्या घराचे आणि घरातील वस्तुंचे कसे नुकसान झाले, हे तुम्हाला दिसून येईल. व्हिडीओत काही घरे दाखवली आहेत. पावसाच्या पाण्यामुळे घरातील वस्तु खराब झाल्या आहेत. व्हिडीओत एक कार्यालय सुद्धा दिसत आहे.पुरामुळे या कार्यालयातील कागदपत्रांचा कचरा झालेला दिसत आहे. कार्यालयात ही कागदपत्रे कचऱ्यासारखी पडलेली दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. असे कोणाबरोबर पुन्हा घडू नये, असे वाटेल. हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील सिंहगड रोडवरील काही घरांचा आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral video)

हेही वाचा : Mark Zuckerberg: मेटाचा लोगो, प्रार्थना अन्… मार्क झुकरबर्गला सोन्याची चैन दिली भेट; VIDEO शेअर करत केला ‘या’ गोष्टीचा खुलासा

that_puneri_boy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “पुरानंतर पुण्यातील सिंहगड रोडवरील घरांची अवस्था”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप वाईट होते हे 2 दिवस” तर एका युजरने लिहिलेय, “फार वाईट स्थिती असती ही..” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय अवस्था ती..” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून दु:ख व्यक्त केले आहेत.

मागील आठवड्यात पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात जोरदार पाऊस आला. या दोन दिवसाच्या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. शाळा, दुकाने बंद होती. पुण्यातील लोकांना सुरक्षित घरी राहा, असे आवाहन प्रशासनाकडून केले होते. पण काही लोकांच्या घरातच पाणी शिरल्याने दयनीय अवस्था दिसून आली.